*सरल महत्वाचे* :
दिनांक : 02/07/2016
*स्टुडंट पोर्टल* :
1)काल दिनांक 01/07/2016 रोजी लातूर आणि औरंगाबाद विभागातील जिल्ह्यांची मागील शैक्षणिक वर्षांमध्ये भरलेली 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याची माहिती सिस्टिम द्वारे ऑटो अपडेट केलेली आहे.म्हणजेच आता मागील वर्षी माहिती भरलेला विद्यार्थी आपणास जर 1 ली ला असेल तर तो आता 2 री ला दिसून येणार आहे.याचाच अर्थ असा की स्टुडंट ट्रान्सफर करताना आतापर्यंत आपण एखाद्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षीच्या वर्गात ट्रान्सफर request करण्यासाठी शोधत होतो ते आता मागच्या वर्गात ना शोधता चालू वर्षीच्या वर्गात शोधावे लागणार आहे याची नोंद घ्यावी.हे करत असताना सध्या लातूर आणि औरंगाबाद विभागाच्याच जिल्ह्याचे विद्यार्थी फक्त ऑटो प्रमोट केले आहे हे लक्षात घ्यावे.या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्याच्या विद्यार्थयांसाठी मात्र आपणास सदर विद्यार्थी ट्रान्सफर request पाठवाताना मागील वर्षीच्याच वर्गातच त्यांचा शोध घेऊन request पाठवावी लागेल याची नोंद घ्यावी.
2)आज दिनांक 02/07/2016 रोजी पुणे विभागातील जिल्ह्यांच्या विद्यार्थ्याचे ऑटो अपडेशन केले जाणार आहे त्यासाठी पुणे विभागासाठी म्हणजेच पुणे,अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी आज दुपारपर्यंत पोर्टल उपलब्ध असणार नाही याची नोंद घ्यावी.त्यानंतर वरील 1 नंबर ची सूचना आपणास देखील लागू राहील हे लक्षात घ्यावे.
3)सिस्टिम द्वारे ऑटो अपडेशन करताना फक्त 1 ते 8 वीच्याच मुलांचे पुढील वर्गात अपडेशन होईल,मात्र 9 ते 11 वीच्या मुलांचे updation हे मॅन्युअली करावे लागेल हे सर्व मुख्याध्यापकांनी लक्षात घ्यावे.
4) Duplicate students च्या बाबतीत : विद्यार्थी ट्रान्सफर करण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतल्या डुप्लिकेट म्हणजेच एकाच विद्यार्थ्याची 2 व 2 पेक्षा अधिक वेळा त्या शाळेत नोंद झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या अधिकच्या नोंदी सिस्टिम मधून delete करायचे आहे.आपण जर या डुप्लिकेट नोंदी delete केल्या नाही तर beo आणि Eo लेवल वरून सदर नोंदी delete केल्या जातीलच परंतु आपण या नोंदी delete का केल्या नाही यासाठी आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.कारण या वर्षी होणाऱ्या संच मान्यतेसाठी ही बाब अतिशय महत्वपूर्ण समजली जाणार आहे.तसेच आपल्या शाळेत एखादा विद्यार्थी डुप्लिकेट असेल आणि आपण त्या विद्यार्थ्याच्या अधिक च्या नोंदीला delete केले नसेल तर अशा विद्यार्थ्यास आपणास ट्रान्सफर करता येणार नाही.अशा विद्यार्थ्याची नोंद वरिष्ठ लेवल ला आपोआप सिस्टिम द्वारे कळवली जाईल याची नोम्ड घ्यावी आणि त्वरित आपल्या शाळेतील डुप्लिकेट स्टूडंट सिस्टिम मधून delete करण्यात यावे.
5) लातूर,औरंगाबाद आणि आज होणाऱ्या पुणे जिल्ह्याचे ऑटो प्रमोशन करताना जर एखाद्या शाळेत 1 ते 4 वर्ग असतील अशा शाळेत इयत्ता 4 थी च्या अद्याप इतर शाळेत ट्रान्सफर न झालेले विद्यार्थी सिस्टिम द्वारे त्याच शाळेत निर्माण केलेल्या आभासी 5 वीच्या वर्गात ट्रान्सफर होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ठेवले जाणार आहे.सदर चे विद्यार्थी आपल्या शाळेच्या एकूण पटसंख्येत धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.जेंव्हा या आभासी वर्गातील विद्यार्थ्याची ट्रान्सफर करण्याची request येईल तेंव्हा आपण या विद्यार्थ्यास ट्रान्सफर करू शकाल.अशाच प्रकारे या पद्धतीने पुढील वर्ग नसणाऱ्या शाळांच्या बाबतीत पुढील आभासी वर्ग सिस्टिम द्वारे निर्माण करून पुढील इयत्ता नसलेले विद्यार्थी हे अशा वर्गात तात्पुरते ठेवले जाणार आहे.
6)इयत्ता 9 वी ते पुढील वर्गाचे विद्यार्थी पुढील वर्गात मॅन्युअली प्रमोट करताना जर विद्यार्थ्यास 35 टक्के पेक्षा कमी मार्क्स असतील तर त्यांना सिस्टिम द्वारे अनुत्तीर्ण म्हणून ग्राह्य समजले जात होते परंतु 35 टक्के पेक्षा अधिक असणारे विद्यार्थी देखील अनुत्तीर्ण असू शकतात ही बाब लक्षात घेऊन असे विद्यार्थी उत्तीर्ण की अनुत्तीर्ण आहेत ही बाब मुख्याध्यापकांनी मॅन्युअली भरन्यायाची सोय उपलब्ध केली जाणार आहे हे लक्षात घ्यावे.
7) मॅन्युअली प्रमोशन करताना विद्यार्थी अनुत्तीर्ण अथवा absent असूनही जर चुकून पुढील वर्गात प्रमोट झाला तर तर अशा चुकलेल्या प्रमोशन ला आपणास पुन्हा परत (undo) करता येणार आहे.ही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आलेला आहे.
8)नवीन वर्ग उघडलेल्या शाळांना आपल्या शाळेची माहिती भरताना तो वर्ग add करता येणार आहे त्यामुळे आता या नवीन वर्गात ट्रान्सफर होऊन आलेले इतर शाळेतील विद्यार्थी नोंदी आपणास घेता येतील,तोपर्यंत आपण घाई न करता वाट पहावी ही विनंती.
9)इयत्ता 9 वी व त्या पुढील विध्यार्थी शाळा सोडून गेले असतील तर अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत ऑनलाइन नोंदी बाबत काय करायचे याबाबत वरिष्ठ लेवल वर विचार सुरु आहे.याबाबतच घेतलेला निर्णय आपणास लवकरच कळविण्यात येईल तोपर्यंत आपण अशा विद्यार्थ्याच्या बाबतीत काळजी करू नये व इतर काम पूर्ण करून घेणे.
10)तसेच आपल्या शाळेतील 10 वी चे विद्यार्थी 11 वीला न जाता डिप्लोमा अथवा इतर व्यावसाईक शिक्षणास गेले असतील अशा विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदी बाबत देखील काय करायचे हे देखील आपणास लवकरच कळवले जाईल.
11) सरल बाबत अधीक माहिती जाणून घेण्यासाठी व वेळोवेळी अपडेट मिळण्यासाठी राज्यस्तरीय व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामिल व्हा.त्यासाठी havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर जा आणि तेथे राज्यस्तरीय whatsapp समूहात add होण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या गूगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरा.आपणास लवकरच add केले जाईल.
*Mdm पोर्टल*
12) ज्या शाळेत नविन वर्ग सुरु झाले आहेत अशा शाळांना त्या वर्गाची आपली पोषण आहार माहिती भरणे शक्य होत नाही आहे अशा शाळांना आता beo लेवल वरन नवीन वर्ग add करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.अशा शाळांनी beo लेवल शी संपर्क सधावयाचा आहे.
13)आपल्या शाळेची रोजची उपस्थिती आणि लाभार्थी ची ऑनलाइन नोंद घेताना इंटरनेट सुविधा उपलब्ध नसलेल्या शाळांना text message करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तो मेसेज कसा करावा याबाबत मार्गदर्शनासाठी havelieducation.blogspot.in या आमच्या ब्लॉग ला भेट द्या.तसेच text message मध्ये इयत्तनिहाय लाभार्थी संख्या ना नोंदवता एकूण लाभार्थी संख्या नोंदवायची आहे .जरी इयत्ता निहाय संख्या नसली तरी आपण पाठवत असलेली माहिती योग्य आहे काय अशी काळजी करण्याचे गरज नाही आहे.जर आपण ऑनलाइन माहिती भरली आणि त्यानंतर आपणास वाटले की आपलंई माहिती चुकली आहे तर आपण पुन्हा टी माहाती अपडेट करू शकता.आपण त्याआ दिवशी शेवटची माहिती जी भरून अपडेट कराल टी माहिती आपली।अंतिम माहिती म्हणून ग्राह्य समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.आगोदर आपण सरल वेबसाइट मधून माहिती भरली असेल तर पुन्हा अपडेट करताना आपण वेबसाइटसह aap किंवा text मेसेज द्वारे देखील माहिती अपडेट करू शकाल.याची नोंद घ्यावी.
14) आपल्या शाळेत जे पोषण आहार साहित्य पुरवले जाते त्याची नोंद घेण्यासाठी आपणास स्टॉक इनवर्ड चा फॉर्म आपणास उपलबद्ध करून दिला जाणार आहे.या मध्ये पुरवठा कोणाकडून झाला त्याची देखील नणंद करावयाची आहे.ही नोंद करत असताना जर पूरवठादारामध्ये आपण पुरावठादारासह पब्लिक,इतर शाळा,इतर,आपलीच शाळा कॅटेगिरी निहाय,दुकानदार अशा वेगवेगळ्या पूरवठादारांच्या नोंदी घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
तांदूळ अथवा इतर साहित्य इतर शाळेतून उसने घेताना आपण ते दसरया शाळेच्या कोणत्या कॅटेगिरी कडून (1 ते 5 किंवा 6 ते 8) घेतले आहे याचे देखील स्टॉक इनवंर्ड नोंद करण्याच्या फॉर्म।मध्ये घ्यावी लागणार आहे.आज हा फॉर्म आपणास उपलब्ध करून दिला जाणार आहे.तसेच आपण आपल्याच शाळेचा 1 ते 5 किंवा 6 ते 8 कडून साहित्य उसने घेतले असेल तर तशी नोंद घेण्याची सुविधा देखील या फॉर्म।मध्ये उपलब्ध करून देण्यत आलेली आहे याची नोंद घ्यावी.
15) मसाल्याचे पदार्थ ओपनिंग बॅलन्स मध्ये नोंद घेताना मिलीग्रॅम मध्ये भरायचे आहे.परंतु अद्याप।मिलिग्रॅम मध्ये नोंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे.परंतु लवकरच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल तोपर्यंत आपण या फॉर्म मध्ये किलोग्रॅम मध्येच नोंद घ्यावी.सिस्टिम कडून आपण भरलेले किलोग्रॅम मधील नोंदी मिलीग्रॅम मध्ये convert करून घेतल्या जातील याची नोंद घ्यावी.
16)opening balance भरताना आपनाकडे साहित्य शिल्लक नसेल आणि आपण साहित्य उसने घेतले असेल तर आपण त्याची मायनस मध्ये करावी.
17)काही मुख्याध्यापकाचे अथवा शाळेचे नंबर mdm मध्ये रजिस्टर होत नसेल तर ते beo लेवल वरून त्वरित add करून घ्यावे.तशी सुविधा beo लॉगिन ला उपलब्ध करून दिली आहे.नंबर add करताना 2 दिवसापासून समस्याच येत होती टी समस्याच आता दूर करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.
18)beo लेवलसाठी शाळांचे रिपोर्ट काढत असताना management निहाय रिपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.या सुविधेमध्ये आता all management हा ऑप्शन देखील उओलब्ध करून दिला जाणार आहे जेणेकरून सर्व management ची माहिती एकाच वेळी चेक करणे beo लॉगिन ला सोपे जाणार आहे.
19)mdm पोर्टल मध्ये आपनास महिनाअखेरी पोषण आहारासंबधी सर्व रिपोर्ट सिस्टिम कडून जनरेट करून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
20)पोषण आहार पोर्टल बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
*स्कूल पोर्टल*
21) आपणास स्कूल पोर्टल मध्ये मागील वर्षी प्रमाणे भरलेली ऑनलाइन माहिती आणि स्टुडंट समरी या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच 2016-17 साठी भरावयाची आहे.परंतु ही माहिती online न भरता ऑफलाईन भरायची आहे ही बाब महत्वाची आहे.ती कशी भरायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन आपणास प्रशिक्षणाद्वारे दिली जाणार आहे यासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन सुरु झालेले आहे.येत्या 2 दिवसात आपणास ऑफलाईन माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टल मध्ये एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.त्या लिंकद्वारे आपणास आपल्या शाळेसाठी आपल्या शाळेचा udise नंबर असलेली एक zip file डाउनलोड करता येईल.आणि त्या file मध्ये आपण आपल्या शाळेची माहिती भरायची आहे.आणि पुन्हा ती माहिती अपलोड करावयाची आहे.सविस्तर माहितीसाठी havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या..
22)सरल संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येईल.तेथे दिलेल्या विविध online google फॉर्म च्या मदतीने आपण आम्हाला आपल्या येणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात सांगू शकाल.तसेच आपण ९४०४६८३२२९ या whatsapp क्रमांकावर देखील message पाठवू शकता (call करू नये ).
23)✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :
आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)
24) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com किंवा
c)support.education@maharashtra.gov.in
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364