Monday, 31 July 2017

Mahadbt Portal विषयी

*Mahadbt Website Par Escholarship Form Online Apply Kaise Kare-*
  Scholarship Ki Jankari

महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत *Escholarship* की वेबसाइट
के किसी तकनीकी कारण की वजह से या करार ख़त्म होने के कारण से बंद कर दिया गया है .
अब सभी छात्र जो *Scholarship Form* भरेंगे उनके लिए Maharashtra Government
https://www.maharashtra.gov.in की तरफ से पुराने Escholarship Portal से
हटाकर नए महाडीबीटी http://mahadbt.gov.in के Scholarship Portal पर
बनाया गया है. आज की पोस्ट से आप जान सकते है की किस तरह से *2017-18 से सभी*
*Pre-Matric Scholarship, Post Matric Scholarship पात्र छात्र स्कॉलरशिप के लिए*
*नयी वेबसाइट पर स्कॉलरशिप फॉर्म आवेदन भर सकते है.MahaDBT Website Par*
*Escholarship Form Online Apply कैसे करे।*

महाडीबीटी महाराष्ट्र शासन- Ministry of Social Justice के द्वारा चलाया जाता
है. जो लाभपात्र लोगो की मदत के लिए बनाई गयी वेबसाइट है. *Mahadbt Portal* को
बनाने का उद्देश्य ही OBC Scholarship, SC, VJNT, SBC Scholarship लाभपात्र
छात्र, लोगो के लिए Online Application, Fast Approval और लाभपात्र व्यक्ती के
लिए सिधे पूरा लाभ दिलाना है. Samaj Kalyan Vibhag Scholarship के लिए अब इसी
पोर्टल पर अप्लाई कर सकते है.

        *MahaDBT Ke बारे मे.*

  * कोई भी व्यक्ति कभी भी, कही से भी MahaDBT Website पर Online E
    Scholarship Application कर सकता है.
  * छात्र हर समय Scholarship Application Status जान सकता है.
  * आसान Verification के लिए Marklist, Caste Certificate, Validity वेबसाइट
    पर अपलोड कर सकते है.
  * Mahadbt Eshcolarship Portal  से हर Student और Institute के लिए Email
    Alert, SMS Alert की सुविधा होगी.
  * आसान Scholarship की Process होगी.
  * Mahadbt के लिए Special Unique User Id और Password दिए जायेंगे.
  * Social justice Department और State Government की तरफ से Online Watch
    रखी जाएगी.


          *Institute और Students के लिए Online Scholarship Form के बारे मे.*

1. Important Information 2017-18 से Scholarship के लिए Aadhar Number
    अनिवार्य किया गया है.
2. Scholarship पात्र छात्रो के लिए अभी से निचे दिए गए सभी स्कॉलरशिप जरुरी
    दस्तावेज जमा करने को कहे.
3. Applicant सभी स्कॉलरशिप रूल्स के अंतर्गत पात्र है यह जिम्मेदारी खुद स्कॉलरशिप
    आवेदक की होगी.
4. Scholarship Form अप्लाई करने की Process ऑनलाइन MahaDBT की वेबसाइट पर होगी.
5. * स्टार किये हुए सभी पॉइंट्स आवश्यक है, ध्यानसे भरे और Scholarship Application
    Online Apply करने पर कम से कम एक बार चेक जरूर करले.


          *MahaDBT Website Par Online Scholarship Form Fill Kaise Kare?*

सबसे पहले Escholarship के लिए Online Apply करने के लिए Google Chrome, Mozilaa
Firefox या Internet Explorar Browser जो आपके कंप्यूटर पर इनस्टॉल हो उसे ओपन करे.

1. महाडीबीटी http://mahadbt.gov.in  वेबसाइट को ओपन करे.
2. वेबसाइट के राइट साइड मे New Scholarship Login के लिए Register पर क्लिक करे.
3. New Registration पर क्लिक करे.
4. अगले स्टेप १ मे Aadhar Card है या नही वह चुने.
5. Next पर क्लिक करे.
6. स्टेप २ मे Aadhar Authentication के लिए OTP या Biometric एक चुने (अगर आपने
    Aadhar Portal पर Mobile Number रेजिस्टर्ड नहीं किया था तो बायोमेट्रिक ऑप्शन
    चुने. अभी बायोमेट्रिक ऑप्शन Disable लेकिन जल्द ही उपलब्ध कराया जायेगा.
7. अगर आप OTP चुनते है तो Aadhar Card Number दर्ज करे.
8. आधार नोटिफिकेशन पढ़े और चेकबॉक्स पर क्लिक करे.  OTP भेजे पर क्लिक करे.
9. अब अगली स्टेप मे Pop up विंडो ओपन होगी Ok पर क्लिक करे.
10. Aadhar Registerd मोबाइल नंबर पर आया 6 Digit कोड OTP मे दर्ज करे.
11. OTP Verified पर Click कर दे. Next पर क्लिक करे.
12. फिर से Pop up विंडो ओपन होगी Ok पर क्लिक करे.
13. स्टेप 3 मे Aadhar की पूरी जानकारी ओपन होगी चेक करे और Next पर क्लिक करे.
14. New User Name दर्ज करे.
15. नया Password भरे जो आप याद रख सके. Confirm Password Again एंटर करे.
16. Capcha Code भरे. Next पर क्लिक करे.

इस प्रकार से ऊपर बताई गयी जानकारी अनुसार *MahaDBT* वेबसाइट पर Scholarship
Login के लिए नया खाता बन चूका है. Login करने के लिए निचे दी गयी प्रोसेस फॉलो करे.

1. निचे दी गयी इमेज अनुसार Select User मे से अगर आप छात्र है तो Resident चुने.
2. User ID जो बनाया है वह एंटर करे.
3. Password दर्ज करे.
4. कैप्चा कोड भरे और लॉगिन पर क्लिक करे.

🙏🏻 *धन्यवाद* 🙏

Friday, 28 July 2017

Savitri Bai Phule Girls Pre Matric Scholarship Scheme


Savitri Bai Phule Girls Pre Matric Scholarship Scheme




The Savitri bai phule girls pre matric scholarship scheme is the scheme launched by Maharashtra government for providing pre matric scholarship to girls students who belong to SC/SBC/VJNT, The girls who are studying into 5th to 10th standard are eligible for applying this scheme. The objective of this scheme is to provide financial assistance to girls students who are economically weaker section.
Benefits of Savitri bai phule girl’s pre matric scholarship scheme:
  • Girls who are studying into 5th standard to 10th standard will get scholarship every year of Rs- 600 per year
 Eligibility for Savitri bai phule girl’s pre matric scholarship scheme:
  1. All girls who belong to SC/SBC/VJNT are eligible for The Savitri bai phule girls pre Matric scholarship scheme
  2. Only girls child are eligible
  3. Girls students of Maharashtra who were studying 5th to 10th standard in Maharashtra can apply for Savitri bai phule scholarship
Document required enrolling for Savitri bai phule girl’s pre matric scholarship scheme:  
  1. Girl student Aadhar card
  2. Residence proof of girl e.g. electricity
  3. Previous years pass Marksheet
  4. Caste certificate
Procedure to apply for Savitri bai phule girl’s pre matric scholarship scheme:
  1. First visit the official website that is mahaeschol.maharashtra.gov.in
  2. Second search for the link new student registration and click on it
  3. Third then you will get the online application form
  4. Fourth fill the application with relevant details of board, year of passing, UID number and other required information
  5. Fifth after that you can get a one online application form, here you can put you all details like board details, state, divisional board other few details
Whom to contact and where to contact:
  1. Since the scholarship is provided to school the details are completely present with school office. student should be aware of the important notices displayed on notice board
Online application form:
  1. Online application form is available over the official site- https://mahaeschol.maharashtra.gov.in
References & details:
  1. https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/Scholarships/Account/Login.aspx#1
  2. https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/DashBoard/Savitribai%20Phule%20User%20manual_Department.pdf

बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल

बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’
🎟
साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती

आयुर्वेद ही भारताची एक ओळख!
संपूर्ण जगाकडे जे नाही ते भारताकडे आहे.
ते ज्ञान म्हणजे "आयुर्वेद. "
त्यामुळे हे शिकण्यासाठी
ज्याप्रमाणे जगभरातून लोक आज भारताकडे येत आहेत, त्याचप्रमाणे कित्येक वैद्य वेगवेगळ्या देशांमध्ये आयुर्वेद प्रचार कार्यासाठी जात आहेत. त्यांना सर्व प्रगत देशांकडून आग्रहाचे निमंत्रण मिळत आहे.
मलासुद्धा गेली ७-८ वर्षे रशियामध्ये आयुर्वेद शिकविण्यासाठी जायची संधी मिळाली.
मात्र प्रत्येक वेळी मीच काही तरी शिकून येतोय की काय असे मला वाटते. कारण आपण जेवढा आयुर्वेद वापरत नाही त्यापेक्षा थोडा जास्त आपलाच आयुर्वेद रोजच्या वापरात वापरणारे लोक मला तिथे भेटले.
एकदा एका रुग्णाशी
सहज गप्पा मारत बसलो होतो तर तो मला तो रोज वापरत असलेल्या भारतीय बाजारपेठेतील काही आयुर्वेदिक वस्तूंची माहिती सांगायला लागला. आयुर्वेदिक टूथपेस्ट, साबण, तेल असे सांगून झाल्यावर तो मला म्हणाला की तुमचा तो
"‘नॅचरल क्रिस्टल सोप "'
तर फारच छान आहे.
रशियन भाषेत नॅचरल चा उच्चार ‘नतुराल’ असा करतात
त्यांच्या भाषेत ऐकायला
फार छान वाटतं. असो. तो म्हणाला, ‘आमच्याकडे ज्यांना ज्यांना या सोपचा अनुभव आला आहे ते सर्वजण हाच वापरतात. फारच सुंदर आहे हा. या मुळे घामाचा दुरगंध बिलकूल येत नाही.
कोणतेही त्वचाविकार असतील तर याच्या नियमित वापरणे ते पटकन बरे होतात,
एवढंच नव्हे तर मासिक पाळीच्या काळात या सोपने अंघोळ केल्यास कोणताही जंतुसंसर्ग होत नाही. हा उत्तम जंतुघ्न आहे. जखम तर फार पटकन भरते, आम्ही काही लागलं, कापलं तर प्रथम यानेच स्वच्छ धुवून घेतो. रक्तस्रावसुद्धा लगेच थांबतो. आता तर इथे सर्व पुरुषमंडळी दाढी केल्यानंतर आफ्टर शेवऐवजी हाच ‘नतुराल क्रिस्टल’ वापरतात. थोडा महाग आहे पण छान आहे.
कुतूहलापोटी मी त्याला तो आणून दाखवायला सांगितला. सायंकाळी तो रुग्ण साबण घेऊन आला. सुंदर बांबूच्या काडय़ांच्या वेष्टनात फार आकर्षक पॅकिंग केलेले होते. साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती. म्हणजे १ किलोची किंमत ४० हजार रुपये. असो. कुतूहल वाढत चाललं होतं, काय असेल कळत नव्हतं एवढं महाग, एवढं गुणकारी आणि तेही भारतीय? आयुर्वेदिक? म्हणून पटकन उघडून पाहिलं. तो आपल्या तुरटीचा खडा होता.
मी खरोखरच चकित झालो. काय सांगावं कळेना. त्याने तुरटीचे सर्व गुण अगदी बरोबर सांगितले होते. आणि आमच्या लहानपणी आमच्या घरी पण हाच वापरला जायचा. अगदी पूर्वी भारतीयांच्या प्रत्येक घराघरांत तुरटीचा एक खडा तरी अवश्य मिळायचा. सर्व पुरुष मंडळी दाढी केल्यावर तर हमखास लावायची. कापलं, लागलं की आमच्या लहानपणीचे हुकमाचे औषध होते ते. माझे विचारचक्र सुरू झाले. आम्ही विसरून गेलेल्या आमच्याच एका सवयीची व औषधाची आठवण त्याने करून दिल्याबद्दल मनातून त्याचे आभार मानले. हे असेच चालू राहिले तर काही काळाने हीच मंडळी आपल्याला आयुर्वेद शिकवतील आणि आपल्याकडे अगदी अजूनही १००-१५० रुपये किलोने मिळणारी तुरटी आपल्याला ४० हजार रुपये किलोने विकतील आणि आपणही ती आनंदाने घेऊ. कारण तेव्हा ती आपली ‘तुरटी’ नसेल. ती रशियन ‘नतुराल क्रिस्टल’ असेल.
महागडे डीओ लावून घामाची दरुगधी घालवण्यापेक्षा एकदा तरी तुरटी लावून पाहा किती छान वाटते. आफ्टर शेवसाठी सर्वोत्तम. खरंच घरातल्या घरात काही जखम झाली, कापलं किंवा खरचटलं की लगेच तुरटीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. जखम पटकन भरून येते व जंतुसंसर्ग पण होत नाही. सततची सर्वांगाची, काखेत, जांघेत खाज सुटत असेल तर तुरटीच्या साबणाने अंघोळ करा. खाज पटकन थांबते. त्वचारोग असणाऱ्यांनी तर आवर्जून या साबणाचा वापर करावा. दातातून, हिरडय़ातून  रक्तस्राव होत असल्यास अथवा दाढ दुखत असल्यास तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात व तुरटीच्या लाहीचे  चूर्ण मध व तुपात कालवून दिवसातून दोन ते तीन वेळा लावावे. तत्काळ उपशय मिळतो.
अशी बहुगुणी आज्जीबाईच्या बटव्यातील तुरटी आजकाल आपल्या किती लोकांच्या घरात आहे?

वैद्य हरीश पाटणकर 
harishpatankar@yahoo.co.in

How to join NDA

*How to join NDA (National Defence Academy)?*
तयारी एन.डी.ए ची…!!!    

(ही माहिती जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्याबद्दल माहिती मिळेल.

         देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.

         भारतीय संरक्षण दले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी" म्हणजेच "National Defence Academy (NDA) / एन.डी.ए." च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन.डी.ए., खडकवासला, पूणे  येथे करवून घेतली जाते.

*पात्रता:*
*शैक्षणिक पात्रता:*
         एन.डी.ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२वीत शिकत असावा अथवा १२वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे.

*वयोमर्यादा:*
         एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय - साडे सोळा ते साडे एकोणीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे.

*निवड प्रक्रिया:*
         एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.

*प्रवेश परीक्षा:*
         एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते.

*सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत:*
         भारतीय सैन्यदलांत अधिकारी होऊ इच्छिणार्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलाखत ५ दिवस चालते. मुलाखत दोन टप्यांत घेतली जाते.

*पहिला टप्पा:*
         या टप्यास स्क्रिनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसर्या टप्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात.

*दुसरा टप्पा:*
         या टप्यात उमेदवारांच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क्स (Group  Tasks) व वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये दिलेल्या चित्रांवरून गोष्ट लिहिणे, दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करणे. दिलेल्या विविध परिस्थितींमधून मार्ग कसा काढणार हे लिहिणे तसेच स्वत:बद्दलचे मत लिहिणे या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. ग्रुप टास्क्स मध्ये विविध प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक चाचण्या घेतल्या जातात. यात उमेदवार विविध अडथळे एक संघ म्हणून कसे पार करतात हे पाहिले जाते. तसेच उमेदवार एक संघ नायक म्हणून कश्याप्रकारे काम करतो हे देखील पाहिले जाते. याच बरोबर येथे गट चर्चांचाही समावेश असतो. या सर्व गट चर्चा इंग्रजी मध्ये होतात. वैयक्तिक चाचण्यांमध्ये दिलेल्या विषयांमधील एका विषयावर तीन मिनिटे भाषण करणे, तसेच जमिनीवरचे विविध अडथळे तीन मिनिटात पार करणे अशा चाचण्यांचा समावेश असतो. हवाई दलात वैमानिक होऊ इच्छिणार्या उमेदवारांची Pilot Aptitude Battery Test  (PABT) ही आणखी एक चाचणी होते.
         मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील त्यांची पुढील काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एन.डी.ए च्या आर्मी, नौदल किंवा हवाई दल या शाखांत आपल्या आवडीनुसार आणि अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानानुसार प्रवेश दिला जातो.

*एन.डी.ए. मधील प्रशिक्षण:*
         एन.डी.ए. मधील प्रशिक्षण कालावधी हा बी. एस. सी. तीन तर बी. ई. चार वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच खडतर शारीरिक व मिलिटरीचे प्रशिक्षणही पूर्ण करतात. एन.डी.ए. मधील बी. एस. सी. चा तीन वर्षांचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो तर बी. ई. 8 टर्म मध्ये.
येथील प्रशिक्षणात ७०% भर अभ्यासावर तर ३०% भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो. येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध स्क्वाड्रन्स मधे विभागणी केली जाते. हे स्क्वाड्रन्स हेच पुढील तीन वर्ष या विद्यार्थ्यांचे घर असते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची नियमितपणे परेड, पोहणे, विविध खेळांची तयारी करवून घेतली जाते. या प्रशिक्षणात येथे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एका १२वी पास विद्यार्थ्यामधून भविष्यातील लष्करी अधिकार्यामधे रुपांतर केले जाते. एन.डी.ए. चे तीन / चार वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले कॅडेट्स आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले की आर्मी, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होतात. एन.डी.ए. च्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अधिकारी पदावर काम करत असतांना नेहमीच आपल्या देशाची व त्यांना घडविलेल्या प्रशिक्षण संस्थेची मान आणि शान उंचावली आहे. या संस्थेने आजवर देशाला दिलेल्या हजारो दर्जेदार अधिकार्यांपैकी अनेक अधिकार्यांना त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्या बद्दल विविध शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे पहिले अंतराळवीर स्क्वाड्रन्स लीडर राकेश शर्मा (अशोक चक्र) हे देखील एन.डी.ए. च्या ३५व्या तुकडीचे विद्यार्थी होते. १२वी नंतर करिअर करण्यासाठी एन.डी.ए. हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

*सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे:*
         एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. पैरा जंपींग, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायंबींग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते.
सातव्या वेतन आयोगा नुसार दरमहा पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते, रहाण्यासाठी क्वार्टर्स, सी.एस.डी. कॅन्टिनची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भरपूर रजा, अभ्यासासाठी पगारी रजा, देश पातळीवर नावाजलेल्या मैनेजमेंट कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राखीव जागा इ. सुविधा मिळतात. येथील अधिकार्यांना जगातील नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळते. अतिप्रगत बंदुका, नौदलातील  लढाऊ जहाजे, पाणबुडी तसेच हेलीकॉप्टर व ध्वनिपेक्षाही वेगाने उडणारे लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे काम करण्याचे समाधान मिळते.

*अर्ज कधी करावे:*
         जून मध्ये १२वी ला प्रवेश घेणारे तसेच १२वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यांची एन.डी.ए. प्रवेशासाठी परीक्षा दि. सप्टेंबर मध्ये घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली ११वीची किंवा १२वी ची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची अंतिम तयारी सुरु करायला हवी. यंदा १२वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए. साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा एप्रिल मध्ये घेण्यात येइल. या विद्याथ्यांना १२वी ची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी एन.डी.ए. च्या तयारीसाठी करावा. 

*शालेय विद्यार्थ्यांसाठी:*
         सध्या शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढील मार्गांनी एन.डी.ए. मध्ये दाखल होऊ शकतात.

एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेण्यासाठी शासनाने विविध संस्थांची स्थापना केलेली आहे. या काही दर्जेदार शिक्षण देणार्या सर्वोत्तम संस्थापैकी काही संस्थांची थोडक्यात माहिती:

१. *सैनिक स्कूल, सातारा: ५वी व ८वी च्या विद्यार्थांसाठी:*
        येथे विद्यार्थ्यांना इ. ६वी व ९वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येते. अर्ज करण्यासाठी इ. ५वी व ८वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. अधिक माहिती *www.sainiksatara.org* या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२. *राष्ट्रीय इंडीयन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून:* ६वी व ७वी च्या विद्यार्थांसाठी:
         येथे विद्यार्थ्यांना इ. ८वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. अर्ज करण्यासाठी इ. ६वी व ७वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळेस, जून व डिसेंबर महिन्यात घेतली जाते. अधिक माहिती *www.rimc.gov.in* या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

३. *सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट (SPI), औरंगाबाद: १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी:*
         या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना इ. ११वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे ११वी व १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी १०वीत शिकत असलेल्या मुलांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन *www.spiaurangabad.com* या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे मध्ये घेण्यात येईल.

         अनेक पालकांची आपल्या पाल्याला एन.डी.ए. मध्ये पाठविण्याची इच्छा असते. परंतु योग्य मार्ग माहीत  नसल्यामुळे त्यांचे पाल्य एन.डी.ए. प्रवेशास मुकतात. बर्याच पालकांचा असा गैरसमज असतो की एन.डी.ए ला जाण्यासाठी घोडसवारी, रायफल शुटींग जमणे किंवा जिमला जाणे आवशक आहे. परंतु वरील माहिती वरून आपल्या लक्षात येईल की एन.डी.ए. च्या लेखी परीक्षेसाठी ११वी व १२वी च्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच मुलाखत उत्तीर्ण करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून एखादा सांघिक खेळ खेळून आपले नेतृत्व गुण विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी रोज थोडावेळ मैदानात जाऊन व्यायाम केला किंवा नियमितपणे मैदानात एखादा सांघिक खेळ खेळला तरीही असे विद्यार्थी एन.डी.ए. निवडी मधील सर्व शारीरिक चाचण्या पूर्ण करू शकतात. एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की एन.डी.ए. ला निवड झालेले बरेचशे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील तसेच कोणत्याही प्रकारची लष्करी पार्श्वभूमी नसलेली असतात. एन.डी.ए. मध्ये फक्त लष्करी अधिकार्यांचेच मुले सिलेक्ट होतात हा देखील एक गैरसमज अथवा न्यूनगंड आहे. गुगल वर थोडा शोध घेतला की लक्षात येईल की एका सर्वसाधारण रिक्षा चालकाचा मुलगा, शेतकर्याचा मुलगा, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, पोलिस हवालदाराचा मुलगा असे बिगर लष्करी पार्श्वभूमी असलेले असंख्य मुले एन.डी.ए. मध्ये दाखल होऊन आज लष्करात अधिकारी पदाच्या मोठ्या हुद्यावर आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घ्या, एन.डी.ए. ला जाण्याचे आपले ध्येय्य निश्चित करा आणि लागा तयारीला....👍
🇮🇳जयहिंद 👋👮🏼