Thursday, 28 September 2017

NMMS 28/9/2017

*दिनांक:२८/०९/२०१७*

*-: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०१७-१८:-* 

*परीक्षा दिनांक : ०३ डिसेंबर २०१७.*

*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती  (NMMS) परीक्षा साठी आवश्यक पात्रता:*

(१) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थिनी NMMS या परीक्षेस बसण्यास पात्र असतात,

(२) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे,

(३) विद्यार्थी / विद्यार्थिनी ई. ७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला / झालेली असावी. (SC/ST/VJ/NTB/NTC/NTD/OBC/SBC किमान ५०% गुण)

(४) शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याकरिता MAT आणि SAT परीक्षेत किमान ४० % गुण आवश्यक, SC/ST/VJ/NTB/NTC/NTD/OBC/SBC किमान ३२ % गुण.

(५) शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना ई. ९ वी व ई. ११ वी मध्ये किमान ५५ % गुण SC/ST/VJ/NTB/NTC/NTD/OBC/SBC किमान ५०% गुण आणि ई. १० वी मध्ये किमान ६०% गुण आणि SC/ST/VJ/NTB/NTC/NTD/OBC/SBC किमान ५५% गुण मिळविणे आवश्यक असेल.

*√(NMMS) परीक्षा साठी ऑनलाईन अर्ज करणे*

*@ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे : दि. ०३/१०/२०१७ ते ३०/१०/२०१७.*
*@ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे : दि. ३१/१०/२०१७ ते ०७/११/२०१७.*
*@ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे भरणे : दि. ०८/११/२०१७ ते १७/११/२०१७.*

*NMMS परीक्षा महत्वाचे / खुलासा*

*१) NMMS राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षासाठी विद्यार्थी अर्ज हे मुख्याध्यापक लॉगिन मधून करावयाचा आहे. विद्यार्थी / पालकांनी वैयक्तिक नेट कॅफे वर जाऊन करण्याची आवश्यकता नाही.*

*२) विद्यार्थी पालक यांचेकडून कोणती कागदपत्रे घ्यावी / कोणती कागदपत्रे घेऊ नये / कोणत्या कागदपत्रांसाठी कोणती पर्यायी कागदपत्रे घेतली तरी चालतील याचा शाळा स्तरावर निर्णय घ्यावा.*

Friday, 22 September 2017

गणित विषय - प्रगत / अप्रगत

गणित विषय - प्रगत / अप्रगत मित्रांनो गणित विषयाची पायाभूत चाचणी झाली आहे. उत्तर पत्रिका तपासणी चालू असेल, कोणता विद्यार्थी प्रगत समजावा, कोणता वर्ग प्रगत आणि कोणती शाळा प्रगत समजावी याविषयी थोडे विवेचन।काही शंका असल्यास जरूर विचार। पायाभूत चाचणी मध्ये मूलभूत क्षमता व मागील इयत्तेच्या क्षमता असे प्रश्न आले आहेत। प्रत्येक मूलभूत क्षमतेमध्ये किमान 75% गुण व एकूण किमान 60% गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत समजावा।वर्गातील सर्व विद्यार्थी प्रगत असतील तर तो वर्ग प्रगत समजावा व शाळेतील सर्व वर्ग प्रगत असतील तर ती शाळा प्रगत समजावी। इ 2 री एकूण गुण 20 पैकी मूलभूत क्षमतेवर 16 गुण व मागील इ वर 4 गुण प्र 1ला 8 पैकी किमान 6 गुण आवश्यक प्र 2 रा 4 पैकी 3 गुण आवश्यक प्र 3 रा 4 पैकी किमान3 गुण आवश्यक एकूण 20 पैकी 12 गुण प्राप्त झाले तर तो विद्यार्थी प्रगत समजावा। इयत्ता 3 री प्र 1 ला संख्याज्ञान वर 8 पैकी किमान 6 गुण आवश्यक प्र 2 रा बेरीज वर 4 पैकी किमन 3 गुण आवश्यक प्र 3 रा वजाबाकी 4 पैकी किमान 3 गुण आवश्यक एकूण30 गुणांपैकी किमान 18 गुण आवश्यक। इयत्ता 4 थी प्र 1ला संख्याज्ञान 4 पैकी 3 प्र 2रा बेरीज 4 पैकी 3 प्र 3रा वजाबाकी 4 पैकी 3 प्र 4 था गुणाकार 4 पैकी 3 गन आवश्यक। एकूण 30 पैकी 18 गुण आवश्यक इयत्ता 5 वी प्र 1ला संख्याज्ञान 4 पैकी 3 प्र 2 रा बेरीज 4 पैकी 3 प्र 3रा वजाबाकी 4 पैकी 3 प्र 4 था गुणाकार 4 पैकी 3 प्र 5 वा भागाकार 4 पैकी 3 एकूण 40 पैकी किमान 24 गुण आवश्यक। इयत्ता 6 वी प्र 1ला,प्र 2रा ,प्र 3रा, प्र 4था, प्र 5 वा प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण। एकूण40 पैकी किमान 24 गुण मिळाल्यास प्रगत। इयत्ता 7 वी प्र 1 ते 5 मध्ये प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण। एकूण 50 पैकी किमान 30 गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत । इयत्ता 8 वी प्र 1 ते 5 मध्ये प्रत्येक प्रश्नात 4 पैकी किमान 3 गुण एकूण 50 पैकी किमान 30 गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत। माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थी प्रगत असतील तर माझा वर्ग प्रगत दंजला जाईल। सर्व वर्ग प्रगत असतील तर ती शाळा प्रगत समजली जाईल। सौजन्य : DIECPD गणित विभाग उस्मानाबाद