सरल
एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सरल
Student Database मध्ये विद्यार्थ्यांच्या भावंडांची(Sinlings) माहीती भरताना तो जर इयत्ता 1 ते 12 पर्यन्त शिकत असेल तर त्याचा Student id आवश्यक आहे
हा Student id तुम्हाला तो विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेत विद्यार्थ्या ची माहिती भरल्यावर घ्यावी लागेल व तुमच्या विद्यार्थ्यासोबत जोडवि लागेल.
इयत्ता 1 ते 12 पर्यन्त शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा Student id मिळेपर्यंत Siblings ची माहिती आपण भरू शकत नाही.
त्यामुळे सर्व शाळांनी Student id साठी एकमेकांना सहाय्य करणे गरजेच
[7/22, 2:15 PM] Pande Sir: Student Database भरताना काही महत्त्वाच्या लक्षात ठेवण्यासारख्या बाबी :
1) मुख्याध्यापकाची भूमिका :-
https://education.maharashtra.gov.in या वेबसाईटच्या HOME PAGE वर SCHOOL, STAFF आणि STUDENT अशा तीन प्रकारच्या टॅब दिसतील. त्यापैकी STUDENT या टॅबवर क्लिक केल्यास

या प्रकारची स्क्रिन दिसेल. Select Role वर क्लिक करून Head Master वर क्लिक करावे. User ID च्या ठिकाणी आपल्या शाळेचा U-DUSE Code टाकावा. पासवर्ड मात्र मुख्याध्यापकांना माहिती असलेला by default पासवर्ड जो मुख्याध्यापकांना सांगितलेला आहे तो टाकावा. (पासवर्ड हा गोपनीय विषय असल्याने या ठिकाणी टाकलेला नाही.) नंतर Captcha टाकावा. Login बटनवर क्लिक केल्यावर आपला पासवर्ड बदलून घेण्यासाठी एक विंडो ओपन होईल. त्यातील सूचनांनुसार पासवर्ड बदलून घ्यावा. परत नवीन पासवर्ड वापरून लॉगीन करावे.

मुख्याध्यापकांनी यातील सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी न करता
1. Division
2. Create teacher User
3. Assign Class Teacher
ह्या तीन गोष्टी पूर्ण करायच्या. आणि पुढील विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम प्रत्येक वर्गशिक्षकाचे राहील.
वरील तीन गोष्टी करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याची कृती याठिकाणी देत आहे.
प्रथम School Details मुख्याध्यापकाचे नाव, मोबाईल नंबर व जन्म तारीख अपडेट करून घ्यावे.
1. Division :
नंतर Master मधील Division वर क्लिक करावे.

याप्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या तुकड्यांच्या संख्येप्रमाणे Division assign करून घ्यावे. प्रत्येक तुकडीची माहिती टाकल्यानंतर Add बटनवर क्लिक करावे.
2. Create teacher User :
यासाठी Maintenance या टॅबर क्लिक करून Create teacher user वर क्लिक करावे.

आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गशिक्षकाची संपूर्ण माहिती टाकून Register करावे. यातील सर्व माहिती अचूक असावी. विशेषत: मोबाईल नंबर. कारण वर्गशिक्षकाला त्यांच्या वर्गाची माहिती टाकण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड रजिस्टर केल्याबरोबर शिक्षकाच्या मोबाईल नंबरवर जाणार आहे.
3. Assign Class Teacher :
शिक्षक रजिस्टर झाल्यानंतर त्यांना त्यांचे वर्ग जोडून द्यायचे आहेत. यासाठी पुन्हा Master टॅबवर जाऊन Assign Class Teacher वर क्लिक करावे.

वर्ग, तुकडी व रजिस्टर केलेल्या शिक्षकांच्या यादीतून शिक्षक निवडून Assign बटनवर क्लिक करावे. याप्रमाणे आपल्या शाळेतील सर्व वर्गशिक्षकांना वर्ग जोडून दिल्यानंतर मुख्याध्यापकाचा Student Portal वरील ऑनलाईन रोल सध्यापुरता पूर्ण होईल.
आता आपल्या शिक्षकांनी त्यांच्या वर्गाची माहिती कशी भरावी हे आपल्यालाच त्यांना समजावून सांगावे लागेल. कारण प्रशिक्षण मुख्याध्यापकांचे झाले आहे वर्ग शिक्षकांचे नाही.
शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरायला सुरूवात करण्यापूर्वी आपल्या खात्यात प्रवेश कसा करावा ? माहिती कशी भरावी ? याबाबत सविस्तर माहिती.
वर्गशिकांना त्यांच्या मोबाईलवर एक system generated SMS मिळालेला असेल. त्यात त्या शिक्षकाचा User ID आणि Password असेल. शिक्षकाला https://education.maharashtra.gov.in या वेबसाईटच्या HOME PAGE वर SCHOOL, STAFF आणि STUDENT अशा तीन प्रकारच्या टॅब दिसतील. त्यापैकी STUDENT या टॅबवर क्लिक केल्यास

अशी विंडो दिसेल. Select Role वरून Class Teacher हा पर्याय निवडावा. आपल्या मोबाईलवर प्राप्त User ID व Password टाकून प्रथम लॉगीन करावे. लगेच पासवर्ड बदलून घेण्यासाठी एक विंडो येईल. त्यातील सूचनांनुसार Password बदलून घ्यावा व परत नवीन Password ने लॉगीन करावे.
यातील Student Details मधील New Student Entry हा पर्याव निवडावा.
वरील चित्रात दिसत आहेत त्याप्रमाणे रकाने भरून पूर्ण करावेत. यातील माहिती भरणे सोपे जावे यासाठी विद्यार्थ्यांची माहिती एका कागदावर आपल्यासमोर असावी यासाठी Student Data Collection चा PDF फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचा फॉर्म अगोदरच भरून ठेवल्यास आपला वेळ वाचेल.
विद्यार्थ्याची Regular, Address & Birth Details
माहिती भरून झाल्यावर खालीलप्रमाणे Family & Bank Details इ. माहिती भरावी.
अशाप्रकारे आपल्या वर्गातील पटावर असलेल्या सर्व मुलांची माहिती वर्गशिक्षक या नात्याने आपल्याला भरावी लागेल.
महत्त्वाची सूचना आपला पासवर्ड गोपनीय ठेवा. ऑनलाईन काम करत असताना आपल्याला काम थांबवायचे असेल तर अशा वेळेस Logout करायला विसरू नका.प्रत्येक ठिकाणी सर्वांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. यावर उपाय म्हणून Offline काम करून नंतर ते Upload करण्याची सुविधा Student Portal मध्ये देण्यात आलेली आहे. Offline माहिती भरण्यासाठी आवश्यक असणारे Excel Sheet Download करा.
====================