Monday, 7 August 2017

MahaDBT पोर्टल विशेष

MahaDBT पोर्टल विशेष*
••••••••••••••••••••••••••••••••
नमस्कार,
आपणा सर्वांना माहीत आहे की यावर्षी पासून सर्व शिष्यवृत्तीचे फॉर्म (अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक सोडून) हे आपणास MahaDBT पोर्टल वर ऑनलाईन भरायचे आहेत
     त्यासाठी काही महत्वाच्या सूचना

💥आपण भरणार असलेला शिष्यवृत्ती फॉर्म हा आधार आधारित असल्याने आधार कार्डवरील खालील माहिती ही अचूक असणे गरजेचे आहे अन्यथा आधार कार्डवरील माहिती त्वरित बदलून घ्यावी.

💥 विद्यार्थ्यांचे नाव:-
      आधार कार्डवरील विद्यार्थ्यांचे नाव व शाळेतील नाव हे एकच असणे गरजेचे आहे.

💥 जन्मतारीख :-
     मुलाची जन्मतारीख सुद्धा शाळेतील व आधार कार्डवरील एकच असावी. व जन्मतारीख ही DD/MM/YYYY या फॉरमॅट मध्येच असावी.

💥पत्ता व लिंग :-
          मुलाचे फॉर्म भरत  असतांना आधार नुसार माहिती आटोमॅटिक येत असल्याने विद्यार्थ्यांचा पत्ता व त्याचे लिंग हे सुद्धा अचूक असणे गरजेचे आहे.

💥 मोबाईल क्रमांक :-
      आपल्या आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर हासुद्धा  लिंक केलेला असावा . आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करतांना आपल्याला OTP प्राप्त होणार नाही. त्यामुळे त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण होऊ शकणार नाही.

💥 बोटांचे ठसे (बायोमेट्रिक नोंदणी ):-
             काही जणांनी मुलांचे आधार कार्ड हे मूल लहान असतांनाच काढलेले आहे त्यावेळी त्यांनी आई किंवा वडिलांचे बोटांचे ठसे नोंदविलेले आहे.
      त्यामुळे अशा मुलांचे बायोमेट्रिक पद्धतीने रजिस्ट्रेशन करतांना मुलांचे बोटांचे ठसे जुळणार नाही.
      त्यासाठी मूल पाच वर्षांचे झाल्यानंतर त्याचे बोटांचे ठसे सुद्धा अपडेट करून घेणे गरजेचे आहे.

      एकंदरीत , विद्यार्थ्यांचे आधार कार्डवरील संपूर्ण डिटेल्स हे अचूक असणे गरजेचे आहे.

💥 बँक खाते:-
       शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे स्वतःचे किंवा विद्यार्थी व पालक यांचे राष्ट्रीयीकृत बँक खाते असणे गरजेचे आहे.
        महत्वाची गोष्ट म्हणजे या बँक खात्यासोबत सुद्धा  आधार क्रमांक लिंक केलेला असणे आवश्यक आहे.
      आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसेल तर आपल्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम डायरेक्ट ट्रान्सफर करता येणार नाही.

💥 आवश्यक कागदपत्रे :-
       MahaDBT पोर्टलवर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करतांना खालील डाकूमेंटस आवश्यक आहेत.
1) ओळखीचा पुरावा :-
           फोटोसह शाळेचे प्रमाणपत्र / रेशनकार्ड
2)  पत्ता तपशील :-
    आधारकार्ड/ रहिवाशी दाखला / बँक पासबुक
3) जन्म तपशिल :-
          जन्म प्रमाणपत्र / फोटोसह शाळेचे प्रमाणपत्र
4) संबंध तपशिल :-
      रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र
5)  बँक खाते झेरॉक्स
6) विद्यार्थ्यांचा एक फोटो

     वरील सर्व डाकूमेंटस ही JPG / PNG/ Tiff / PDF या फॉरमॅट मध्ये स्कॅन करून अपलोड करावी लागतात . स्कॅन केलेल्या डाकूमेंटस ची फाईल साईज ही 256 kb पेक्षा कमी असावी.

  वरील सर्व माहिती नीट समजून घेतल्यास विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यास सोपे होईल.

💥 अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या कामगारांच्या पाल्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
   विद्यार्थी रजिस्ट्रेशन साठी वरील कागदपत्रे ही आवश्यक आहेतच. शिवाय फॉर्म भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
     
1) वडील / विद्यार्थी अधिवास (रहिवासी ) प्रमाणपत्र
2) मागील वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
3) अपंग असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र
4) वडील / विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र
5) वडील किंवा आईचे अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
6) 20 रु.च्या स्टॅम्पवर पालक अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे पालकाचे स्वयं घोषणा पत्र
7) मागील वर्षाची गुणपत्रिका

     अस्वच्छ शिष्यवृत्तीचा फॉर्म हा कोणत्याही जातीचा विद्यार्थी भरू शकतो फक्त त्याचे पालक अस्वच्छ व्यवसाय करणारे असावे.

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Minority today's special2017-18

Minority today's special

श्री. जुन्नरकर साहेब व
श्री आशितोष पाटील सर हे दिनांक 04/07/2017
रोजी मार्गदर्शन करत असताना काही महत्वाचे मुद्दे

1. अल्पसंख्याक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे असे काही नाही ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे फक्त त्यांचे उत्पन्न पाहून फॉर्म भरावेत..

2. वर्ग दिसत नसल्यास आपल्या school login मधून त्याला update करावे.

3. Grade system 8 वि पर्यंत आहे पर्यंत पण त्याला आपण grade टक्यावरूनच ठरवत असतो म्हणून ते टक्के टाकावे.

4.शाळा जर अनुदानित नसेल तर पुढील प्रमाणे १. ऍडमिशन फीस :- 500
२. Tution फीस :- 3500 ३. Misc fees :- 1000 भरावे.
आणि जर अनुदानित किंवा zp ची असेल तर आपण फक्त misc fees :- 1000 भरावे.

5. कोणतेही document अपलोड करायचे नाहीत.

6. Final submit करत नाही तो पर्यंत तो फॉर्म अपूर्ण आहे म्हणून तो फायनल करत जावे.

7. फॉर्म काही कारणास्तव defect केला तर तो डिफेक्ट फॉर्म परत दुरुस्त करून फायनल सबमिट करावा.

8 . फायनल 2 प्रिंट काढून 1 प्रिंट पालकाला पासवर्ड लिहून द्यावी व एक ऑफिस मध्ये जमा ठेवावी.

9. शाळा regeister नवीन असेल तर district लॉगिन वर मागावा.

10. शाळेचा default पासवर्ड:- guest123#

11. स्कूल पासवर्ड हा मागील वर्षी जो आहे तोच राहणार आहे .

12. Misc fees अनिर्वार्य असून ती 1000 टाकावी.

13. शाळा सुरू झाली दिनांक 15-06-2017 .

14. Passing year 2017 लिहावे .

*स्कूल लॉगिन साठी पुढील कार्ये*
1. Section
या वर्षी साठी 2017- 18
निवडावे.

2. User id व पासवर्ड हा व्यवस्थित लिहून ठेवावा.

3. Dashboard दिसेल .

4. Edit profile मधून तुम्ही व्यवस्थती माहिती भरावी.

5. Add and update details मध्ये

1. Add and update course level
मध्ये जाऊन course निवडावा.

2. या नंतर add अँड update course मधून तुम्हाला class add करायची आहे.

3. Renewal अँप्लिकेशन लिस्ट 2017

4. Application reverifiaction मध्ये जे फॉर्म defect केले होते त्यासाठी आहे.

5. Reject ऑपशन हे फक्त पूर्ण फॉर्म चुकीचा आहे त्यासाठी आहे फक्त..
रिजेक्ट फॉर्म हा स्कूल लॉगिन मधेच असतो.

6. फॉर्म verify करणे सुरू करावे .

7. Otp मुळे शाळेने प्रत्येक वर्गासाठी एक दिवस देऊन त्यादिवशी पालकांना बोलावून फॉर्म भरावा.

*सर्वात महत्वाची माहिती पासवर्ड विषयी*

1. School माहिती ही letter pad वर घ्यावी.

2. ती माहिती eo ऑफिसमध्ये inward केली पाहिजे .

3. फॉर्म शाळेतच भरले गेले पाहिजेत.

4. पासवर्ड हा जपून ठेवावा.

5. सोबत udies school रिपोर्ट कार्ड अनिर्वार्य.

6 . खाजगी असल्यास 3.1 मान्यता अनिर्वार्य.

*Imp note:-*
ज्या विद्यार्थ्यांचे पालकांचे उत्पन्न खरच 1 लाख पेक्षा कमी असेल त्यांचे फॉर्म भरावेत.

*हेल्प line*

1. सोप्या काही तांत्रिक अडचणी असतील तर वेबसाईट वर faq अशी टॅब आहे त्यातले सर्व प्रश्न आपले समाधान असेल.

2. School user id and पासवर्ड साठी हेल्पडेस्क वर msg न करता eo ऑफिसला सांगितलेले document घेऊन जाणे व inward करावे.

*Renewal फॉर्म बाबत*

१.Renewal फॉर्म हे इन्स्टिट्यूट लॉगिन दाखवलेले विद्यार्थी लिस्ट आहे.
अन्यथा प्रत्येक विद्यार्थी 2016 - 17  लॉगिन करून पाहा.

2. Renewal काही विद्यार्थी आले नसतील तर त्यांचे गुण पाहावे .

    *फॉर्म भरताना*
१. पालकांनी स्वतः प्रतिज्ञा पत्र लिहून द्यावे .

२. Ifsc code असलेली बँक
आधार क्रमांक जोडलेले अकाउंट आहे.

3. Otp हा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी असून तोच पालक आहे हे समजण्यासाठी असून .

४. Otp बंद करणे हे गरजेचे नसून उत्तम नियोजन करू शकता.

फॉर्म हे पुढील साठी असून त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे
1. मुस्लिम
2. Christian
3. बौद्ध
4. जैन
5. पारशी
6. शीख

आपणास पुढील माहिती साठी खूप खूप शुभेच्छा.....

एक ध्येय निश्चित करू या लास्ट date 31/08/2017
असली तरी आपण ती 25/08/2017 पर्यंत पूर्ण करू..

From
श्री भोसले आर डी
पुणे

Sunday, 6 August 2017

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती : सर्वसाधारण माहिती

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती : सर्वसाधारण माहिती

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती २०१७-१८ बाबत महत्त्वाचे

अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीचे online form

फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना
CLICK TO READ

या वेबसाईटवर जाऊन student login मध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे Registration करावे. त्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.
           १) http://scholarships.gov.in हे वेब पोर्टल ओपन करावे. त्यातील          
Login to Apply   यावर क्लिक करावे त्यानंतर  New User ? Register Here यावर क्लिक करावे.

तेंव्हा खालील प्रमाणे फॉर्म ओपन होईल
.
२) यात माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे.
.
मिळालेल्या APPLICATION ID व जन्म तारीख टाकून लॉगीन करून फॉर्म भरावा. 

विद्यार्थ्याचे Registration केल्यावर प्रत्येक विद्यार्थ्यास २० अंकी टेम्पररी आय डी मिळेल. हा आय डी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर देखील sms ने जाईल. हा आय डी व जन्म तारीख टाकून विद्यार्थ्याचे लॉगीन करावे व onlineApplication
भरावे.

           Registration केल्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो,पालकाचे उत्पन्नाचे स्वयंघोषना पत्र,  धर्माबाबतचे स्वयंघोषना पत्र,  मार्कलीस्ट, पत्त्याचा पुरावा, विहित नमुन्यातील वेरीफिकेशन फॉर्म, विहित नमुन्यातील विद्यार्थ्याचे घोषणापत्र, बँक पासबुक हि कागद पत्रे लागणार आहेत. हि कागदपत्रे लाल रंगातील शब्दावर click केल्यास आवश्यक नमुन्यातील फॉर्म open होतील. त्याची प्रिंट काढून घ्या  व भरुन जतन करुन ठेवा.

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फोर्म भरण्यासाठी
३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत मुदत आहे..

अल्पसंख्यांक शिष्वृत्ती सन २०१६-१७ मध्ये निवडलेल्या फिद्यार्थ्यांची यादी पहाण्यासाठी आपल्या शाळेच्या लॉगीन मधून खालील प्रकारातील
Official Login
Institute Login (Click Here)
District Login (Click Here)
State Login (Click Here)
Ministry Login (Click Here)

.

institute login मार्फत खालील प्रमाणे शाळा ओपन करावी.

Login for Institute
User Id and Password are same as last year User Id and Password

 
Can't See? Click on Refresh Button.
Login
यामध्ये माहिती भरून लॉगीन केल्यास खालील प्रमाणे पेज ओपन होईल.

Dashboard
Profile Edit
Scholarship Recipients 2016-17 Fresh
Scholarship Recipients 2016-17 Renewal
Verified, Defective & Rejected List
Logout
त्यामधील scholarship recipients 2016-17 fresh / renewal वर क्लिक करून यादी पहा.
नंतर लॉगऔट होऊन २०१७-१८ सालासाठी लॉगीन करून भरलेले फॉर्म वेरीफाय करावेत.