Thursday, 28 September 2017

NMMS 28/9/2017

*दिनांक:२८/०९/२०१७*

*-: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०१७-१८:-* 

*परीक्षा दिनांक : ०३ डिसेंबर २०१७.*

*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती  (NMMS) परीक्षा साठी आवश्यक पात्रता:*

(१) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थिनी NMMS या परीक्षेस बसण्यास पात्र असतात,

(२) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे,

(३) विद्यार्थी / विद्यार्थिनी ई. ७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला / झालेली असावी. (SC/ST/VJ/NTB/NTC/NTD/OBC/SBC किमान ५०% गुण)

(४) शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याकरिता MAT आणि SAT परीक्षेत किमान ४० % गुण आवश्यक, SC/ST/VJ/NTB/NTC/NTD/OBC/SBC किमान ३२ % गुण.

(५) शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना ई. ९ वी व ई. ११ वी मध्ये किमान ५५ % गुण SC/ST/VJ/NTB/NTC/NTD/OBC/SBC किमान ५०% गुण आणि ई. १० वी मध्ये किमान ६०% गुण आणि SC/ST/VJ/NTB/NTC/NTD/OBC/SBC किमान ५५% गुण मिळविणे आवश्यक असेल.

*√(NMMS) परीक्षा साठी ऑनलाईन अर्ज करणे*

*@ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे : दि. ०३/१०/२०१७ ते ३०/१०/२०१७.*
*@ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे : दि. ३१/१०/२०१७ ते ०७/११/२०१७.*
*@ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे भरणे : दि. ०८/११/२०१७ ते १७/११/२०१७.*

*NMMS परीक्षा महत्वाचे / खुलासा*

*१) NMMS राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षासाठी विद्यार्थी अर्ज हे मुख्याध्यापक लॉगिन मधून करावयाचा आहे. विद्यार्थी / पालकांनी वैयक्तिक नेट कॅफे वर जाऊन करण्याची आवश्यकता नाही.*

*२) विद्यार्थी पालक यांचेकडून कोणती कागदपत्रे घ्यावी / कोणती कागदपत्रे घेऊ नये / कोणत्या कागदपत्रांसाठी कोणती पर्यायी कागदपत्रे घेतली तरी चालतील याचा शाळा स्तरावर निर्णय घ्यावा.*

No comments: