शून्याच्या शोध आणि इतिहास
संख्यांच्या दुनियेत अनन्यसाधारण महत्व आहे ते शून्याला... ज्याची किंमत काहीच नाही तो शून्य... काहीही नाही म्हणजे ज्याच अस्तित्व नाही तो शून्य.. हा शून्य जेव्हा एकटा असेल तेव्हा त्याला काही अस्तित्व नसते परंतु तो जेव्हा 1 च्या पुढे ठेऊ तेव्हा त्या एकची ताकद दहापट करून 1 चे 10 करण्याचे सामर्थ्य मात्र 0 मध्ये आहे...
0 चे अस्तित्व निर्माण होण्यागोदर संख्यांच्या अनेक पद्धती वापरल्या जायच्या.. जसे आपण संध्या 10 पाया असलेली दशमान हि पद्धत वापरतो.. तशी पूर्वी 5 च्या पायावर आधारित क़्विनरि पद्धत होती.. ज्यामध्ये फक्त पाचच अंक होते.. जसे आपल्या दशमान पद्धतीत 0 ते 9 असे 10 अंक आहेत.. पूर्वी 8 पाया असलेली ओक्ट्ल पद्धत होती.. तसेच 16 पाया असलेली हेक्झाडेसीमल हि संख्यांची गणन पद्धत सुद्धा अस्तित्वात होती..
शून्याचा शोध लागण्यागोदर बेरीज , वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करण्यासाठी खूप त्रास व्हायचा.. त्यामुळे गणिताची फारशी प्रगती त्या काळात होत नव्हती... मोठमोठ्या गणिती क्रिया करताना येणाऱ्या त्रासाला अगदी सगळे वैतागले असावे.. अंकागानितासाठी एखादी सोपी पद्धत शोधावी अस सर्वाना वाटत होत.. आणि हा प्रश्न सोडवला भारतीय गणिततज्ञ ब्राम्हगुप्त याने...
आर्यभटानंतर भारतीय गणितात ब्राम्हगुप्त या गणिततज्ञाने भरीव कामगिरी केली.. शून्याच्या शोधाबरोबर ब्राम्हगुप्त याने चक्रीय चौकोनाचे क्षेत्रफळ कसे काढायचे याचे सूत्र सुद्धा शोधले होते... बऱ्याच लोकांचा समज आहे कि आर्यभट याने 0 चा शोध लावला परंतु ऐतिहासिक पुराव्याने हे सिद्ध होते कि शून्याचा शोध हा ब्राम्ह्गुप्त याने लावला होतं..
हूपर या प्रसिद्ध इतिहासकाराच्या मते, अनेक औषधी आणि वैज्ञानिक पद्धतीप्रमाणे भारतीयांनी पाश्चिमात्य जगाला शून्याची देणगी दिली. तिचा परीस्पर्श झाल्यावरच युरोपीयांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये घोडदौड सुरु केली..(संदर्भ :अच्युत गोडबोले यांच्या गणिती पुस्तकातून : पान न. ३० शेवटच्या ३ ओळी )
शून्य जेव्हा या संख्यांच्या नगरीत अवतरला त्यानंतर खऱ्या अर्थाने गणिताची प्रगती होत गेली.. आणि गणिताची प्रगती झाली म्हणून विज्ञानही खूप पुढे गेलं.. अन्यथा आपण अजून काही वर्षे मागेच असतो.. म्हणून 0 म्हणेजे भारतने जगाला दिलेला कोहिनूर पेक्षाही मौल्यवान हिरा आहे असे म्हणायला हरकत नाही...
शून्याच्या (Zero) शोधाबद्दल आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त या दोन्ही महान भारतीय गणितज्ञांचे योगदान आहे, ज्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला आहे.
शून्याचा शोध कोणी लावला, हा प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून, ही एका संकल्पनेच्या विकासाची प्रक्रिया आहे.
शून्याच्या शोधामागचे वास्तव (गैरसमज स्पष्टीकरण)
शून्याच्या संकल्पनेचा विकास दोन टप्प्यांत झाला आणि या दोन्ही टप्प्यांमध्ये आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांचे महत्त्वाचे योगदान आहे:
१. शून्य: केवळ एक 'स्थानधारक' (Placeholder)
योगदान: आर्यभट्ट (इ.स. ४७६-५५०)
गैरसमज: अनेकदा लोक आर्यभट्टांना शून्याचे थेट 'जनक' मानतात.
आर्यभट्टांनी त्यांच्या 'आर्यभटीयम्' या ग्रंथात अंक लिहिण्यासाठी स्थानमूल्य पद्धती (Place-Value System) चा वापर केला होता. या पद्धतीत, एखाद्या ठिकाणी अंकाची अनुपस्थिती दर्शवण्यासाठी शून्याची संकल्पना आवश्यक होती.
जरी आर्यभट्टांनी 'शून्य' या चिन्हाचा (Symbol) थेट उल्लेख केला नसला तरी, त्यांनी 'ख' (Kha - आकाश/पोकळी) या शब्दाचा वापर अंकाच्या अनुपस्थितीसाठी केला, ज्यामुळे स्थानमूल्य पद्धतीचा उपयोग शक्य झाला. त्यांच्या कामामुळेच शून्याला 'स्थानधारक' (placeholder) म्हणून महत्त्व प्राप्त झाले.
२. शून्य: एक 'अंक' (Number) आणि त्याचे नियम
योगदान: ब्रह्मगुप्त (इ.स. ५९८-६६८)
वास्तव: गणितामध्ये शून्याला एक स्वतंत्र 'अंक' म्हणून परिभाषित करणारे ब्रह्मगुप्त हे पहिले गणितज्ञ होते.
ब्रह्मगुप्तांनी त्यांच्या 'ब्रह्मस्फुटसिद्धांत'(Brahmasphutasiddhanta) या ग्रंथात शून्य (शून्य) ही केवळ पोकळी नाही, तर तो एक स्वतंत्र अंक आहे हे स्पष्ट केले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी शून्य वापरून गणितीय क्रिया (बेरीज, वजाबाकी, गुणाकार) कशा करायच्या याचे नियम पहिल्यांदाच सांगितले.
उदा. एखाद्या संख्येत शून्य मिळवल्यास/वजा केल्यास काय होते, किंवा शून्याचा गुणाकार काय असतो, हे त्यांनी निश्चित केले.
निष्कर्ष:
शून्याचा 'स्थानधारक' म्हणून पाया: आर्यभट्टांनी रचला.
शून्याला 'अंक' म्हणून परिभाषित करणारे आणि त्याचे नियम देणारे: ब्रह्मगुप्त हे होते. त्यामुळे गणिताच्या आधुनिक जगात शून्याचे अधिकृत जनक म्हणून ब्रह्मगुप्तांना श्रेय दिले जाते, कारण त्यांनीच शून्याला एक पूर्ण गणितीय अस्तित्व प्रदान केले.
हा शोध एका विशिष्ट बिंदूवर पूर्ण न होता, अनेक शतके चाललेल्या भारतीय गणितज्ञांच्या योगदानातून विकसित झाला, ज्यामध्ये आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि त्यापूर्वीचे पिंगला यांसारखे विद्वान यांचा सहभाग आहे.


No comments:
Post a Comment