eZeeSTORM चा शिक्षक व मुख्याध्यापकांनी वापर कसा करावा
1) प्रत्येक शाळेतील मुख्यध्यापक व सर्व शिक्षकांनी ezeeSTORM हे अॅप आपल्या अॅन्ड्राईड मोबाईलवर Play Store मधून डाऊनलोड करून इंस्टॉल करावयाचे आहे.
2) अॅप डाऊनलोड झाल्यावर सर्व प्रथम एक रजिस्ट्रेशन चा फॉर्म समोर येतो, तो भरून अॅपच्या होमस्क्रीनवर पोहचायचे आहे.
3) App Registration करतांना आपल्या शाळेचा 11 आकडी UDISE school code आपणाला माहित असणे आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना व शाळेतील क्लार्क, सुपरवायजर इत्यादी भूमिकेतील लोकांना मुख्यध्यापकांचा मोबईलवर नंबर माहित असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीकडे अनेक मोबाईल नंबर असल्यास त्याने फक्त एकच कॉमन नंबरचा वापर सर्व ठिकाणी करावयाचा आहे.
मुख्यध्यापकाला केंद्रप्रमुखाचा (cluster Head) मोबईल नंबर माहित असणे गरजेचे आहे.
4) App रजिस्ट्रेशन मधे
i) सर्व प्रथम आपला शाळेतील रोल निवडायचा आहे. जसे की Head Master, Class Teacher, Subject Teacher, Clerk, etc.
ii) School Code: यात आपल्या शाळेचा ११ आकडी UDISE कोड टाकायचा आहे.
iii) Select User Type मधे Free User पासून सुरवात करायची आहे
iv) School Name: मधे आपल्या शाळेचे नाव लिहायचे आहे
v) User First name : यात आपले नाव
vii) User Last name : यात आपले अडनाव
vii) User mobile Number: यात आपला सर्व प्रचलीत 10 आकडी मोबाईलवर नंबर लिहा. येथे जो नंबर आपण लिहिणार आहात त्यावर रजिस्ट्रेशन पुर्ण करण्याकरिता लागणारा OTP, SMS व्दारा पाठविण्यात येणार आहे. तो OTP आपणाला रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याकरिता लागणार आहे, म्हणुन आपला वर्कींगमधे असलेलाच नंबर येथे वापरा.
viii) Class Teacher म्हणुन आपण अॅप रजिस्टर करत असाल तर ‘’Enter HM Mobile No’’ असा प्रश्न विचारलेला असेल. येथे तुमच्या सद्यस्थितीत असलेल्या HM चा मोबाईल नंबर लिहा.
आपण Head master ह्या रोलमध्ये अॅप इंस्टॉल करत असाल तर “Enter cluster head mobile No”. हा प्रश्न विचारलेला असेल, येथे आपल्या शाळेशी संबंधीत सद्यस्थितीतील केंद्रप्रमुखाचा नंबर लिहा.
ix) Address मध्ये आपला सविस्तर पत्ता लिहा,
State, District, Taluka येथे त्या फिल्डमध्ये टचकरून योग्यती माहिती निवडा, येथे फक्त सिलेक्ट करावयाचे आहे, PIN code मधे आपल्या एरियाचा 6 आयडी पिनकोड लिहा.
x) Email id मध्ये आपल्या मोबाईल मधे आपणच वापरलेला ईमेल आईडी आपोआप सिलेक्ट केल्या जातो, तो तुम्ही बदलू शकता.
आपल्या मोबालमध्ये GPS सुरु असल्यास आपले पृथ्वीतलावरील लोकेशन Lat, Long व्दारा स्वतःहुनच पिकअप होते. सर्वात शेवटी “Register App" बटनवर क्लिककरून अॅप रजिस्टर करा. ही संपूर्ण माहिती अगदी बरोबर असणे खुप आवश्यक आहे त्यावरच आधारित अनेक बाबी पुढे रिपोर्टिंगला लागतात.
5) अॅप रजिस्ट्रेशन झाल्यावर मुख्यस्क्रीन समोर येतो. त्यावरील सर्वात वरील ओळीमध्ये दिलेल्या Menu मधील “SETTINGS” शब्दाला क्लिक करा. या मेनूमध्ये Head Master नी त्यांचा मोबाईलवरुन सर्वप्रथम माहिती अपडेट करणे व अपलोड करणे गरजेचे आहे. शक्यतोवर प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकानेच सर्वप्रथम अॅप इंस्टॉल करावा व नंतर इतर रोलमध्ये असलेल्या सर्व व्यक्तींनी त्यांचा मोबाईलवर अॅप इंस्टॉल करावा.
SETTINGS मेनूमध्ये तुम्ही अॅप रजिस्टर करतांना वापरलेला UDISE Code समोर येतो व आता बदलता येत नाही, UDISE Code चुकला असल्यास सरळ सरळ अगोदर अॅप uninstall करा व पुन्हा योग्य माहितीसह Playstore मधुन डाऊनलोड करून अॅप पुन्हा Install करा.
6) Setting मेनुमधे session फिल्डला टचकरून 2015-16 निवडा. class ला टचकरून आपल्या शाळेत असलेला एक एक वर्ग निवडा. section मधे त्या वर्गच्या अनेक तुकड्या असल्यास क्रमशः A पासून सुरुवात करून आपणाकडे असलेल्या सर्व तुकड्यांच्या वर्गशिक्षकांची नोंद करावयाची आहे. Class Teacher मधे त्या वर्गाच्या त्या तुकडीकरिता असलेल्या वर्गशिक्षकांचे नाव लिहा. Mobile No मधे त्या वर्गशिक्षकाचा मोबाईल नंबर लिहा.
एकच शिक्षक एक व एकापेक्षा जास्त कितीही वर्गांचा वर्ग शिक्षक असु शकतो. हेडमास्तर स्वतःच एक किंवा अनेक वर्गाचा वर्ग शिक्षक असु शकतो.
एका वर्गातील एका तुकडीसंबधी संपुर्ण माहिती भरून झाल्यावर “Submit” बटनाला क्लिक करा. खाली तुम्ही अॅड केलेले सर्व वर्गशिक्षक दिसतील. एका वेळेस, एकाच वर्गाचे संपूर्ण काम केल्याजावुशकते त्याकरिता ज्या वर्गावर तुम्हाला फोकस करायचे आहे त्या वर्गासमोरील लाल पट्टीवर (red strip) क्लिक करा तिचा रंग बदलून हिरवा होईल (green strip ). यापुढील सर्व कामाकरिता Back बटन दाबुन होम स्क्रीनवर परत या.
आपणाकडे असलेल्या प्रत्येक वर्गाची setting मेनुमध्ये नोंद करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा आपले पुढील सर्व मेनु चुकतील.
7) Staff Attendance कसे घ्याल :- class setting मेनुमधे HM व्दारा वर्गशिक्षक ठरवणे व ती माहिती अपलोड करने आवशक आहे. staff module मधे staff attendance ची सुविधा आहे. HM ने स्वताःच्या मोबाईल मधुन त्यांच्या कडे असलेल्या संपुर्ण staff ची माहिती Define Role मधे भरणे गरजेचे आहे. class setting मेनुमधे class teacher म्हणून भरलेली सर्व नाव Define Role मधे आपोआप येणारच आहेत.
Define Role हा मेनु फक्त Head Master लाच भरण्याचा अधिकार आहे.
स्वत:चा रोल हा Head Master Role म्हणुन अगोदरच त्यामधे एंट्री असणार आहे. सर्व वर्गांचे वर्गशिक्षक Class Setting मधे Define करून झाल्यानंतर आपणाकडे इतर कोणता स्टाफ नसेल तर Define Role मधे इतर कोणतीही एंट्री टाकण्याची आवश्यकता राहणार नाही. Clerk, Subject, Teacher, School Local Management, Superviser इत्यादी पदे असल्यासच Define Role मधे माहिती भरावी लागेल. एका कर्मचाऱ्याची एकच एंट्री (मोबाईलनंबरवर आधारीत) Define Role मधे टाकायची आहे.
शिक्षकाला Setting मेनुमधे माहिती भरण्याची आवश्यकता नाही.त्यांनी फक्त “SYNC DATA” बटनवर क्लिककरावे, HM ने declare केलेल्या क्लास टीचरची लीस्ट आपल्या मोबाईल मधे ऑटोमॅटिक डाऊनलोडकरून मिळेल, तसेच Staff Module मधील “Define Role” मेनुमधे सुध्दा ऑटोमॅटिक सर्व Staff चा data डाऊनलोड होईल. सर्व प्रथम HM च्या मोबाईलवरून काम पूर्ण होणे आवश्यक आहे.
8) सर्व कर्मचाऱ्यांचे अटेंडंसघेण्यासाठी Staff Module मधील Staff Attendance मेनुला क्लीक करा. त्यामधे तुम्हाला तुमच्याकडील सर्व कर्मचाऱ्यांची लीस्ट दिसेल. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावासमोर Camera बटन दिसेल त्याला क्लिककरून समोरील कर्मचाऱ्याचा सही करतांनाचा फोटो घ्यायचा आहे. ज्यांचे अटेंडंसघेऊन झाले त्यांचे नाव समोरील यादीमधुन वगळले जाईल जेणे करून नेमक्या किती लोकांचे अटेंडंस घ्यायचे राहीले हे आपणाला कळेल.
9) जो कर्मचारी कोणत्याही कारणाने हजर नसेल तर त्याच्या नावांवर क्लिक करा Staff Report नावांचा मेनु समोर येईल, तेथे तुम्ही गैह्जर असलेल्या व्यक्ती विषयी कारण देऊन कोणत्या प्रकारात त्याची अनुपस्थीती आहे तो ऑपशन सेव्हकरू शकणार आहे. Show Staff Report ला क्लीक केल्यास आपण तयार केलेला रिपोर्ट बघायला मिळेल.
10) HM अनुपस्थीत असल्यास कोणताही एक शिक्षक अथवा अनेक शिक्षक त्यांच्या त्यांच्या मोबाईल वरून सुध्दा अटेंडंस नोंदवू शकता. कोणत्या व्यक्तीव्दारे अटेंडंस घेतल्या गेले हे सर्व्हरवर कळण्याची व्यवस्था आहे.
Upload attendance : आज आपल्या मोबाईलवर स्टाफचे घेतलेले अटेंडंस सर्व्हरवर अपलोड करण्यासाठी Menu मधील “Upload Attendance” मेनु क्लिककरा
Upload Absent Report : कोणत्याही कारणाने अनुपस्थीत शिक्षकांची माहिती अपलोड करण्यासाठी upload Absent Report मेनुवर क्लीक करा.
Dowload attendance : सर्व्हवर अपलोड केलेला डेटा आपल्या मोबाईल मधे डाऊनलोड करण्यासाठी Menu मधील “Download attendance” मेनुवर क्लिक करा.
Staff & Student Report : स्टाफ व विद्यार्थ्यांचा संपुर्ण रिपोर्ट बघण्यासाठी घ्या मेनु उपयोग होतो.
Student Attendance : ह्या मेनुमधे प्रत्येक वर्गाची वर्गवारी उपस्थीती भरण्याची सुविधा आहे. ज्या वर्गाची उपस्थीती भरायची आहे, त्या वर्गा समोरील Active बटनवर क्लिक करून त्या वर्गाची माहिती भरायची आहे व Submit बटनवर क्लिक करून माहिती सेव्ह करायची आहे.
No comments:
Post a Comment