Friday, 10 March 2017

‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणुकीसाठी सुवर्ण काळ

‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणुकीसाठी सुवर्ण काळ! बँकांमधील आवर्ती ठेव (आरडी) अनेकांना ठाऊक असेल. दीर्घावधीच्या गुंतवणुकीद्वारे संपत्ती निर्मितीचा ‘सिप’द्वारे (एसआयपी) मार्ग समंजस गुंतवणूकदारांनी पुरेपूर जाणला आहे. गेल्या दोन वर्षांतील ‘सिप’ गुंतवणुकीच्या वाढत्या ओघाची आकडेवारी याचा प्रत्यय देते. बँकांमधील आवर्ती ठेव (आरडी) अनेकांना ठाऊक असेल. याची सवय झालेल्यांसाठी म्युच्युअल फंडातील सिप (एसआयपी) गुंतवणूक यात साम्य वाटेल. हा तसाच प्रकार आहे मात्र यात गुंतवणूक शेअर बाजार, कर्जरोखे, सोने इ. पर्यायांमध्ये केली जाते. सिपमध्ये गुंतवणूकदार नियमितरीत्या, एकसारखी रक्कम निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवतात. नियमितरीत्या बचत करण्याचा हा एक सुलभ मार्ग असून, गुंतवणुकीत सातत्य व शिस्त हा या पद्धतीचा सर्वात मोठा गुण आहे. त्यामुळे त्या त्या वेळी असलेली किंमत व त्यासाठी चुकते केलेल मोल याच्या सरासरीतून (रुपी-कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग) दीर्घ काळासाठीचे लाभ मिळतात. अ‍ॅव्हरेजिंगमुळे किंमती जेव्हा कमी असतात तेव्हा गुंतवणूकदारांसाठी अधिक युनिट्स विकत घेतले जातात तर किंमत जास्त असते तेव्हा कमी युनिट्स विकत घेतले जातात. त्यामुळे दीर्घ काळात कमी आणि जास्त किंमतीची सरासरी होत असते. यात मेख अशी गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आणि त्यासाठी वाट पाहण्याच्या भलत्या नादात गुंतवणूकदार फसत नाहीत. कारण निष्णात व्यावसायिकांनाही बाजाराची नेमकी दिशा सांगणे कठीण असते, तेथे आपण गुंतवणुकीची वेळ साधण्याच्या फंदात पडणे मूर्खपणाच ठरतो. बाजाराची योग्य वेळ नव्हे तर योग्य वेळी बाजारात केलेल्या गुंतवणुकीमुळे संपत्ती निर्मिती होते, असे समर्पकपणे म्हटले गेलेच आहे. BJP corporators chant 'Modi-Modi' slogans before Shivsena in BMC म्युच्युअल फंडातील समभागसंलग्न (इक्विटी) गुंतवणुकीने दीर्घ कालावधीत (पाच वर्षांपेक्षा अधिक काळ) चलनवाढीच्या दरापेक्षा अधिक परतावा दिलेला आहे. म्हणजे जर चलनवाढीचा वार्षिक सरासरी दर सहा टक्के असेल तर दीर्घ कालावधीत शेअर बाजारातील गुंतवणुकीतून कोणताही काळ निवडला तरी सहा टक्क्यांपेक्षा अधिक परतावा म्हणजेच प्रत्यक्ष लाभ दिला आहे. सिपद्वारे केलेल्या गुंतवणुकीचा दुसरा फायदा चक्रवाढ गतीने लाभ असा आहे. त्यामुळे गुंतविलेली छोटी रक्कम दीर्घ काळासाठी कल्पनाही करता येणार नाही इतक्या मोठय़ा रकमेत रूपांतरित होते. दीर्घावधी दृष्टिकोनाचे फायदे बाजाराची, निर्देशांकांच्या पातळ्यांची चिंता करायचे सोडा. गुंतवणुकीसाठी दीर्घ काळाचा विचार करा. मुळातच गुंतवणुकीला लवकर सुरुवात केली तर नंतर आपोआपच गुंतवणुकीचा कालावधी मोठा राहतो आणि परतावा रक्कमही मोठी असते. गुंतवणूक सुरू करताना तुमच्याकडे एक किंवा अधिक वित्तीय उद्दिष्टे व गुंतवणुकीचा निश्चित कालावधी असतो. व्यावसायिक चक्रातून बाजार सातत्याने जात असतो. त्यामुळे सिपचा मार्ग निवडला तर बाजारातील चढ-उतारांपासून तुमच्या गुंतवणुकीचे थोडेफार रक्षण होते. त्यामुळे तुमचा पैसा एक किंवा अधिक चांगल्या निधी व्यवस्थापकाकडे सोपवा, जो कमी खर्चात दीर्घावधीत तुमचा पैसा वाढवून देईल. त्यासाठी व्यवस्थापकाच्या ज्ञान व कौशल्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. योग्य फंडाची निवड बाजारात शेकडो इक्विटी म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत मात्र गुंतवणूकदारांनी जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार फंडाची निवड करावी. गुंतवणुकीसाठी मोठी गंगाजळी (अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट) असलेल्या फंडांचा इतर खर्च कमी असतो. १,००० कोटींपेक्षा कमी गंगाजळी असलेल्या डायव्हर्सिफाइड इक्विटी म्युच्युअल फंडांचा व्यवस्थापनाचा खर्च हा हजार कोटींपेक्षा अधिक गंगाजळी असलेल्या इक्विटी म्युच्युअल फंडांपेक्षा जास्त असतो. अनेक गुंतवणूकदारांप्रमाणे तुम्हीही तुम्हाला मिळणाऱ्या परताव्याच्या काळजीत असाल. मात्र सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की, परताव्याच्या प्रकारासह वेगवेगळ्या प्रकारांनीही योजनेचे विश्लेषण करता येते. वर्षांनुवर्षे मिळणारा परतावा पाहताना वार्षिक सरासरी वृद्धी दर- सीएजीआर हा त्यापैकी एक प्रमुख निकष असू शकतो. या व्यतिरिक्त भावनिक गोष्टींचाही विचार करायला हवा. गुंतवणूक म्हणजे, तुमच्याकडील खर्चाव्यतिरिक्त रक्कम योग्य ठिकाणी गुंतविणे आणि काळागणिक तुमची गुंतवणूक वाढताना पाहणे यापेक्षा दुसरी समाधानाची गोष्ट नाही. त्यासाठी संयम, सबुरी, शिस्त मात्र ठेवायला हवी. समभागांत गुंतवणूक करावी की इतर पर्यायांमध्ये? पैसा शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवावा की, अन्य सुरक्षित पर्यायांमध्ये याचा निर्णय गुंतवणुकीचा कालावधी पाहून घ्यावा. शेअर बाजारात जरी मोठय़ा प्रमाणात चढउतार होत असले इतिहासातील परतावा पाहता समभागांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळण्याची शक्यता वाढते. प्रत्यक्षात घसरणीपेक्षा वधारणा होणारी वर्षे जास्त आहेत. नकारात्मक परताव्यापेक्षा सकारात्मक परतावा मिळण्याची शक्यता जास्त आहे. गेल्या २० वर्षांचा विचार केला तर त्यातील सहा वर्षे बाजाराने वार्षिक ४० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे तर केवळ २००८ सालात बाजारात ४० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. जर एखाद्याने एस अ‍ॅण्ड पी बीएसई सेन्सेक्समध्ये ३१ डिसेंबर १९९३ मध्ये १० हजार रुपये गुंतविले असतील तर २० वर्षांनंतर ही गुंतवणूक ६१,१०० रुपये झालेले असतील. म्हणजेच, वार्षिक ९.५ टक्के परतावा होतो. त्यात १ ते २ टक्के लाभांशाच्या माध्यमातून मिळालेला परतावा अतिरिक्त गृहीत धरायला हवा. हेच १० हजार रुपये मुदत ठेवींमध्ये गुंतविले असते आणि त्या त्या वेळेच्या व्याजदरांनुसार मुदत ठेवींचे नूतनीकरण करत गेलो असतो तर ही गुंतवणूक ४७,१०० रुपये झाली असती. मात्र या लाभावर २० टक्के कराचा विचार करता कर कपातीनंतर ही रक्कम शिल्लक उरते ३७,७०० रुपये. शेअर बाजारात मात्र दीर्घकाळासाठी गुंतवणूक ठेवली तर कर भरावा लागत नाही. – बी. गोपकुमार (लेखक रिलायन्स सिक्युरिटीज्चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)