Monday, 24 August 2015

shalrth system is update

----------------
     ••अत्यंत महत्तवाचे••
(सर्व मुख्याध्यापक व सर्व मास्टर ट्रेनर्स )
      शालार्थ online वेतन प्रणाली मधील महत्तवाच्या बदलाबाबत :-

आजपर्यंत आपण voucher entry करून नवीन पगार बील बनवत होतो व ते forward करत होतो... परंतु या महिन्यापासून शालार्थ योजना आपल्या अंतिम टप्प्यात पदार्पन करत आहे. त्या दृष्टीने काही बदल करण्यात आले आहेत..
"Change Statement" ही नवीन कल्पना यामधून समोर आली आहे...

त्यामुळे पगार बनविताना खालील STEPS लक्षात घेेउन पगाराची प्रक्रिया पूर्ण करावी...

अ) Voucher Entry :-
पूर्वी प्रमाणेच प्रथम voucher Entry करावी.

रस्ता :-
Worklist - payroll - payroll generation view -  view /approve /delete bill ...

• Select previous month  & Bill No.
• नंतर आपले मागील महिन्याचे Bill open होईल.
• नंतर click on  check box .
• नंतर click on Voucher Entry
• नंतर voucher entry no. आणि दि. भरा.
आता तुमची voucher Entry पूर्ण झाली...

ब) Generate Change Statement :-
"हा नवीन भाग.."

     Voucher Entry झाल्यानंतर त्याच page वर
खाली उजव्या बाजूला असणार्या Generate Change Statement वर click करा..

• Select Bill No. & Bill Type - paybill...
• click on " Generate"

आता तुमचे change statement तयार झाले..

क) Forward Change Statement :-
आता आपल्या समोर चालू महिन्याचे change statement तयार झालेले असेल ...
• नंतर click on check box ..
• नंतर खाली डावीकडे असणार्या "Forward change statement" वर click करा...

ते change statement आता Approve होण्यासाठी DDO lvl2 कड़े व् तेथून level3 कड़े  जाईल.

ड) Paybill Generation:
   आता पाठविलेले change statement DDO कडून approve होईपर्यंत वाट पहावी...

आपले change statement Approve झाले कि नाही हे आपण वरील ( अ मधील) रस्त्याने view /approve /delete या page वर जाऊन पाहू शकतो..
तेथे statement समोर status मध्ये "change statement approved " असे आले की आपले statement approve झाले असे समजावे..

• नंतर click on check box
• नंतर click on Generate pay bill...
आता आपले बील तयार होईल..

ते तयार झालेले बील Forward करा..

•• ठळक सूचना :-
१) Internet Explorer चा वापर सर्वोत्तम राहील...
Chrome आणि इतर browser मध्ये काही त्रुटी आहेत..
२) जर कर्मचार्यांचे bank details मधील IFSC कोड चुकले असतील तर change statement तयार होणार नाही. आधी तो IFSC code दुरूस्त करावा लागेल...
३) View /approve / delete या page वरच अधिक(अंदाजे ९८%) काम करायचे आहे..

आपण वरील माहिती वाचून आपल्या शाळेचे काम करणार्या शिक्षकांपर्यंत पोहचवावी . धन्यवाद

No comments: