Monday, 16 November 2015

Maitain speed of internet

इंटरनेट वेगाची दुसरी गोष्टतांत्रिक बदल

डीएनएस बदलावा

ब्रॉडबँड सेवा पुरवणारी कंपनी कोणतीही असली, तरी डोमेन नेम सर्व्हरच्या (डीएनएस) कामगिरीवरून ती सेवा किती वेगाने आपल्यापर्यंत पोहोचते, हे ठरत असते. त्यासाठी लोकल एरिया कनेक्शन किंवा वायरलेस नेटवर्क कनेक्शनमधील डीएनएस सर्व्हर ८.८.८.८ किंवा पर्यायी डीएनएस सर्व्ह ८.८.४.४ इतका असणे आवश्यक आहे. ही सुविधा गुगलतर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयपीव्ही-४ मालिकेतील कम्प्युटरसाठी हे डीएनएस सर्व्हर आदर्श ठरू शकतात. तथापि, तुम्हाला आयपीव्ही-६ मालिकेतील कम्प्युटरसाठी हे डीएनएस वापरायचे असल्यास त्यासाठी अनुक्रमे २००१:४८६०:४८६०:८८८८ आणि २००१:४८६०:४८६०:८८४४ हे कोड्स वापरावे लागतील. त्याचप्रमाणे, इंटरनेटवर डीएनएसशी संबंधित शोधाशोध केल्यास गुगल डीएनएस हेल्परवर क्लिक करून यासंबंधी एक छोटेसे सॉफ्टवेअर डाउनलोड करता येईल. या सॉफ्टवेअरमध्ये 'स्विच टू गुगल डीएनएस' या पर्यायावर क्लिक केल्यास हे बदल सहज होऊ शकतील.

'डीएनएस कॅचे' हटवा

एकदा आपल्या कम्प्युटरवर सुरू केलेल्या वेबसाइट्स पुन्हा उघडताना जलदगती सुरू व्हाव्यात, यासाठी ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे डीएनएस कॅचे साठवले जातात. हे कॅचेही दर काही दिवसांनी हटवणे आवश्यक आहे. त्यासाठी कीबोर्डवरील विंडोज व 'आर' या की एकत्र दाबाव्या. त्यानंतर स्क्रिनवर येणाऱ्या बॉक्समध्ये CMD ही अक्षरे टाइप करावीत, त्यानंतर जो कमांड प्रॉम्प्ट येईल, तिथे ipconfig/flushdns ही कमांड टाकावी. तिथेच एक्झिट टाइप केल्यानंतर या कॅचे जातात.

'एसएनआर' व्हॅल्यूची तपासणी

सिग्नल टू नॉइज रेशो (एसएनआर) हे आपल्याला मिळणारा इंटरनेटचा सिग्नल आणि त्यामध्ये येणारे अडथळे यामधील प्रमाण आहे. हे प्रमाण १३ डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास आपल्याला डाउनलोडसाठी चांगला वेग मिळू शकतो. यासाठी ब्राउजरच्या अॅड्रेस बारमध्ये १९२.१६८.१.१ किंवा १९२.१६८.१.२ टाइप करावे. एसएनआर १३ डेसिबलपेक्षा कमी असल्यास इंटरनेटचा वेग कमी होणे, कनेक्शन तुटणे, वेबसाइट ओपन न होणे यांसारख्या समस्या भेडसावू शकतात. कमांड दिल्यानंतरही हे प्रमाण वाढत नसल्यास फोनची वायर बदलणे, वायरचे मोडेम कनेक्शन तपासणे यांसारखे उपाय करता येऊ शकतात.

अटेन्युएशन व्हॅल्यूची तपासणी

डाउनलोडिंगला चांगला वेग मिळण्यासाठी एसएनआरप्रमाणेच अटेन्युएशन व्हॅल्यू तपासणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. वेगवान इंटरनेटसाठी अटेन्युएशन व्हॅल्यू ४५ डेसिबल इतकी असणे आवश्यक आहे. मॉडेम अद्ययावत असल्यास त्यावरच अटेन्युएशन व्हॅल्यू पाहता येऊ शकते. अन्यथा एसएनआरप्रमाणेच कमांड देऊन ही व्हॅल्यू तपासता येईल. अटेन्युएशन व्हॅल्यू ४५ डेसिबलपेक्षा जास्त असल्यास कनेक्शनमध्ये वारंवार खंड पडणे, वेग मंदावणे यांसारख्या अडचणी येतात. अटेन्युएशनची समस्या दूर करण्यासाठीसुद्धा फोनच्या कम्प्युटरला जोडणाऱ्या तारा बदलणे हाच उपाय आहे.

आणखी काही सेटिंग्ज

योग्य मॉड्युलेशनचा वापर

जर ब्रॉडबँड कनेक्शनची वाहिनी मॉडेम किंवा राउटरकडे येईपर्यंत अनेक ठिकाणी फिरली असेल, तर मॉडेम किंवा राउटरच्या डीएसएल सेटिंगमध्ये केवळ जी.डीएमटी या मॉड्युलेशनचाच वापर करावा. अनावश्यक असलेले इतर सर्व मॉड्युलेशन पर्याय काढून टाकावेत. टेलिफोन एक्सचेंजपासून आपल्या घरापर्यंत आलेल्या वाहिनीच्या अंतराचा वेगाशी काहीही संबंध नसतो. योग्य मॉड्युलेशनसाठी आपल्याला डीएसएल सेटिंगमध्ये आवश्यक बदल करता येतात.

'पीपीपीओई' सुरू ठेवा

'पीपीपीओई' हे 'पॉइंट टू पॉइंट प्रोटोकॉल ओव्हर एथरनेट'चे संक्षिप्त रूप आहे. डायल-अपपेक्षा पीपीपीओई हा सुरक्षित व वेगवान पर्याय आहे. यामध्ये एसएनआर व अटेन्युएशन व्हॅल्यूमध्ये बदल झाला, तर इंटरनेटच्या वेगावर परिणाम होत नाही. कम्प्युटरचा हॅकिंगपासून बचाव करायचा असल्यास हा पर्याय अधिक उपयुक्त आहे.

लाइन प्रोफाइलवर ठेवा लक्ष

सर्वसामान्यपणे टेलिफोन एक्सचेंजमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक कार्ड डीएसएलएएमवर (डीजिटल सबस्क्रायबर लाइन अॅक्सेस मल्टिप्लेक्सर) लाइन प्रोफाइल २ एमबीपीएस इतकी ठेवण्यात आलेली असते. त्यामुळे आपण ४ एमबीपीएसचा प्लान घेतला, तरीही आपल्याला प्रत्यक्षात २ एमबीपीएस इतकाच वेग मिळतो. याविषयीची माहिती घेण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा. आपला प्लान २५६ केबी, ५१२ केबी किंवा १ एमबी इतका असेल, तर लाइन प्रोफाइल २ एमबीवरून १ एमबी करण्याची विनंती संबंधितांना करावी. त्यामुळे एसएनआर वाढून इंटरनेट अधिक वेगवान होण्यास मदत होईल.

लक्षात ठेवा

मॉडेमचा दर्जा

इतर सर्व उपाय योजल्यानंतरही इंटरनेटच्या वेगात कोणतीच सुधारणा दिसून येत नसेल, तर मॉडेम बदलण्याची वेळ झाली आहे, असे समजावे.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
        Tadvi.H.N.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

चेहरा पाहून ‘अनलॉक’ होणारा स्मार्टफोनस्मार्टफोनमध्ये अधिकाधिक महत्त्वाची माहिती साठवण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आपल्याशिवाय मोबाइलमधील माहिती अन्य कुणालाही उपलब्ध होऊ नये, यासाठी पासवर्डसोबत पिन, पॅटर्न, गेश्चर्स, एनक्रिप्शन यांसारखेपर्यायही आमलात आले. परंतु, यापैकी कोणताच पर्याय सुरक्षेची शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही. आता मात्र जिओनी या मोबाइल कंपनीने सुरक्षेसंबंधी एकमेवाद्वितीय उपाय शोधून काढला असून केवळ मोबाइल धारकाच्या चेहेऱ्यासमोर धरल्यानेच अनलॉक होणारा फोन बाजारात आणला आहे.

'एस प्लस' असे या फोनचे नाव असून त्यामध्ये फेस अनलॉक फिचर देण्यात आले आहे. भारतातील सायबर इनफर्मेशनशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर युजरची गरज लक्षात घेऊन जिओनीने हा फोन सादर केला आहे. हा फोन यूएसबी टाइप-सी पोर्ट सिस्टिममधील सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन आहे. डार्क ब्लू, व्हाइट आणि गोल्डन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होईल.'इलाइफ एस प्लस' या ड्यूअल सिम फोनमध्ये अॅन्ड्रॉइड ५.१ लॉलिपॉपऑपरेटिंग सिस्टिम असून त्यावर कंपनीची अमीहो ३.१ यूझर इंटरफेस स्किन आहे. या फोनमध्ये ५.५ इंचाची एचडी सुपर ऐमोलेड स्क्रीन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास - ३ प्रोटेक्शन आहे. यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक प्रोसेसर असून आणि ३ जीबी रँडम अॅक्सेस मेमरी (रॅम) आहे. या फोनची इनबिल्ट मेमरी १६ जीबी , तर एक्सटर्नल मेमरी ६४ जीबी इतकी आहे. हा फोन ड्युअल मायक्रो सिम कार्ड्सची सुविधा आहे.जिओनी 'एस प्लस'मध्ये प्राथमिक कॅमेरा १३ मेगापिक्सल असून त्याला ऑटोफोकस कॅमरा आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा असून त्यासाठी फिक्स्ड फोकस आहे. या स्मार्टफोनसाठी दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीचाही विचार करण्यात आला आहे. फोनची बॅटरी ३१५० एमएएच इतकी आहे. ४-जी एलटीई, ब्लूटूथ ४.०, वाय-फाय, ३-जी, जीपीआरएस/एज, माइक्रो-यूएसबी आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक इत्यादी फोनची अन्य वैशिष्ट्ये आहेत. या फोनची किंमत १६,९९९ रुपये इतकी असल्याचे जिओनीने जाहीर केले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला असून सध्या तो केवळ भारतातच उपलब्ध असल्याचे जिओनीने म्हटले आहे.
WWW.eschool2all.blogspot com

No comments: