☺कमाल कृत्रिम बुद्धिमत्तेची ☺
आज तंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आपण प्रचलित भाषेनुसार आपण तिला चॅटबॉट म्हणू,
आज किंवा आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण किती लोकांशी बोललो? किती वाक्यांची देवाण-घेवाण झाली? एकूण किती शब्द वापरले? कोणते शब्द एकदाच वापरले? कोणत्या शब्दांची किती वेळा पुनरुक्ती झाली? त्यातील जोडाक्षरे कोणती होती? अमुक एके दिवशी किती नवीन शब्द वापरात आले? त्या दिवशी किती लोकांशी बोलणं झालं? त्यापकी प्रत्येक व्यक्तीकडून मिळालेल्या नवीन शब्दांची संख्या किती? एका शब्दाचे किती वेगवेगळे संदर्भ समजले?.. हे सगळे हिशेब आपण बोलताना ठेवू लागलो तर या हिशेबानेच डोकं गरगरू लागेल. क्षणोक्षणी यातील आकडेमोड पुन:पुन्हा व्यवस्थित करताना तोंडाला फेस येईल. या संदर्भात घोटाळे होतील किंवा सुसूत्रता कोलमडेल. पण हे सगळं चॅटबॉट्स व्यवस्थित करू शकतात. आजमितीला बरेच चॅटबॉट्स जरी अस्तित्वात असले तरी त्यांच्या शब्दसंपदेची, शब्दांना जोडून येणाऱ्या संदर्भाची, व्यक्तिवैशिष्टय़ांनुसार (उदा. पुरुष, स्त्री, गर्दी, विद्यार्थी इ.) भाषेच्या वापरासंबंधी औचित्याची जाण मर्यादित आहे. या सगळ्याबद्दल ते जरी अचूक आकडेमोड देऊ शकत असले तरी बोलताना संदर्भात अनोळखी फेरबदल झालेला हाताळणं त्यांच्या आवाक्यात नाही. गंमत म्हणजे, असा हिशेब जरी देण्यास असमर्थ असला तरी सामान्य मानवप्राणी मात्र संदर्भानुसार सुसूत्रपणे बोलू-समजू शकतो. कुत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता यात मुख्य फरक आहे तो हाच. पुढील उदाहरणात कोक, केचप आणि बर्गर सर्व कसे करायचे ही गोष्ट सामान्य माणसाला जरी लगेच लक्षात आली असती तरी या चॅटबॉटच्या लक्षात आलेली नाही. उदा. http://www.artificial-intelligence.com/comic/11 आज तंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आपण प्रचलित भाषेनुसार आपण तिला चॅटबॉट म्हणू, चच्रेचा विषय आहे. चॅटबॉटमुळे संगणक आणि मोबाइल क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रांत क्रांती होणार, अशी भाकितंही केली जात आहेत. साधारण दशकभरापूर्वी आलेल्या डॉट कॉम क्रांतीसारखीच किंबहुना त्याहून अधिक उत्सुकता हे तंत्रज्ञान वापरून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांबद्दल लोकांच्या मनात जागी झालेली आहे. विविध क्षेत्रांत यांच्या वापराबद्दलचे प्रयोग जोरात सुरू आहेत. सोशल नेटवìकगसारख्या किफायतशीर प्रयोगशाळांमधून त्यांची पडताळणी होत आहे. कित्येक कंपन्या अहमहमिकेने या क्षेत्रात उतरलेल्या आहेत. निर्माण केली गेलेली उत्पादने मर्यादित काळात, मर्यादित उपयोगितेसह आजमावली जात आहेत. आणि विशेष म्हणजे काही अपवाद वगळता ती अतिशय यशस्वी ठरत आहेत. भारतातही बरेच चॅटबॉट्स वापरात आहेत, कदाचित आपणही सिटीबँकेचा व्हच्र्युअल असिस्टंट आस्क मी, स्टॉक्सच्या किमतींबद्दल विश्वासार्ह माहिती पुरवणाऱ्या एमी, मुंबई, दिल्ली, पुणे आणि अहमदाबाद शहरातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीभाडय़ाची गोळाबेरीज सांगणाऱ्या रिकफरे हे चॅटबॉट वापरले असतील आणि त्यावरून थोडक्यात या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयीची कल्पना आपणास आली असेल. वरील उदाहरणं अतिशय मर्यादित क्षमतेच्या चॅटबॉटची आहेत. चॅटबॉट्स मुख्यत्वेकरून वैद्यकीय क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणात वापरले जाण्याच्या शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत. त्यावरून त्यांची क्षमता किती असू शकेल याचा अंदाज बांधता येईल. काही मुख्य चॅटबॉट्स: वेब हल – झॅबवेयर या कंपनीतर्फे बनविलेला सुबक चॅटबॉट आहे हल कंपनीतर्फे आपली ओळख करून देताना हा बॉट स्वतबद्दल सांगतो की, मी झाबवेयरच्या अत्याधुनिक हल तंत्रज्ञानावर आधारित आहे. साध्या इंग्रजी भाषेत आपण माझ्याशी संवाद साधू शकता. यात दिलेल्या चौकटीत टाइप करा आणि माझ्याशी बोला. www.Zabware.com या संकेतस्थळावर या बॉटबद्दल संपूर्ण माहिती, उदाहरणे आणि काही कॉमिक्स दिलेली आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील वापरानुसार त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या कंपनीने बाजारात आणलेल्या आहेत. यात छापील अक्षरे वाचून दाखविणारा बॉटही आहे. झिरो – हा दुसरा व्यवस्थित चॅटबॉट कॉम्प्युटर होप कंपनीतर्फे बाजारात आणला आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार याची निर्मिती त्यांच्या वेबपेजवरील भाषेच्या सहज प्रक्रिया आणि त्यामागील अस्पष्ट तर्काबद्दलची जाण विकसित करण्यासाठी केलेला आहे. याचा वापर करून संगणकासंबंधी दिलेल्या प्रश्नोत्तरी मंजूषेतील नेमके संदर्भ शोधण्यासाठी याचा वापर करता येतो. याव्यतिरिक्त जॅबरवकी, एलिझा, ब्रेन बोट, अरिसा, जीटॉक, ट्विटर, किमबॉट, ओपन पॅनडोरा, बोटस्टर, कॉल्युमबिना, सिमसिमी, क्लेव्हरबोट वगरे प्रसिद्ध चॅटबॉट्स सध्या इंटरनेटवर वापरात आहेत. उत्तम चॅटबॉक्सला बक्षिसे देण्याऱ्या ‘चॅटरबॉक्स चॅलेंज विनर्स’सारख्या संस्थासुद्धा आहेत. भारतात फेसबुक वापरणाऱ्यांसाठी हल्लीच फेसबुकतर्फे लायब्रेट चॅटबॉट उपलब्ध करून दिलेला आहे. मेसेंजरमधून भारतात फेसबुकचा वापर करणारे आता या चॅटबोटकडून सल्ला आणि आरोग्यासंबंधी माहिती मिळवू शकतात. या चॅटबॉटकरवी डॉक्टरांशी संपर्क साधता येतो. आजमितीला या चॅटबोट पॅनलवर तब्बल एक लाख डॉक्टरांचा ताफा असल्याचा फेसबुकचा दावा आहे. सध्या ही सोय केवळ आयओएसच्या फोन वापरणाऱ्यासाठीच उपलब्ध आहे. पण पुढे यातून हवामानासंबंधी, वाहतुकीसंबंधीची माहिती इत्यादी सार्वजनिक उपयोगाच्या माहितीसह प्रवासाच्या तिकिटांचे आरक्षण, आपल्या बँकेशी संवाद इत्यादी इतर काही सोयी वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्सवर सर्व स्मार्ट-मोबाइलधारकांना चॅटबॉटकरवी देण्याचा फेसबुकचा विचार असल्याचे समजते. आपले बॉट इतर बॉटपेक्षा वेगळे कसे याबद्दल फेसबुक सांगतो की, मोबाइलवरून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांच्याच हे बॉट्स कामी येणार आहेत आणि येत्या काही काळात छोटय़ा-मोठय़ा बऱ्याच कंपन्या ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी मेसेंजरवर आपापले बॉट्स तयार करताना दिसून येतील. क्लिक करणे किंवा माऊस चालवणे याऐवजी भविष्यात प्रत्यक्ष संभाषणानेच या बॉट्सकरवी संवाद साधला जाणार आहे आणि कामेही करविली जाणार आहेत, असे आपल्याला म्हणता येईल. गंमत म्हणजे, वर्गात दोन मुलं बोलताना दिसली की शिक्षक त्यांना धडय़ावर लक्ष द्यायला सांगतात, हे आपल्या नित्य परिचयाचं आहे, कारण वर्गात आपापसातील बोलणं शिक्षणाच्या आड येतं, अशी सामान्य समजूत आहे. मात्र सध्या शैशवावस्थेत असलेले चॅटबॉट्स आपल्या ज्ञानाची वृद्धी इतरांशी होणाऱ्या संभाषणातूनच वृद्धिंगत करणार आहेत. त्यांच्याशी होणारं संभाषण एकीकडे अतिशय उत्सुकता वाढविणारं असेल तर दुसरीकडे अतिशय वेताग देणारंही ठरेल. उदाहरणादाखल आपण जॅबरवकीशी संभाषणाचा या संकेतस्थळावर नमुना पाहू शकता – www.jabberwacky.com/ यामुळे ब्लूमबर्गच्या साइटवर दिलेल्या एका लेखात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नाडेलासुद्धा म्हणताना आढळतात की, चॅटबॉटला काही विचारायची धास्ती वाटते, कारण बॉट काय बोलेल याचा काही नेम नसतो. मायक्रोसॉफ्टने २३ मार्चला ‘टाय’ (थिंकिंग अबाउट यू) नावाचा बॉटचे किक, ग्रुप मी आणि ट्विटरवर अनावरण केले. ‘टाय’बॉट मुख्यत्वेकरून तरुणाईसाठी बनविलेला आहे. इतरांशी होणाऱ्या संवादातून या बॉटची कृत्रिम बुद्धी विकसित होत असल्याचे लक्षात आल्यावर काही खोडसाळ लोकांनी ‘टाय’ला त्याच्या अवतरित होण्यानंतरच्या काही तासांतच वर्णद्वेषी शब्द बोलणं शिकवलं आणि ‘टाय’ने सरळ बुशसाहेबांवर त्याचा प्रयोग केला. पण, सुरुवातीचे हे काही ठसके सोडले तर बॉट नेटक्या चालीने प्रगती करणार हे निश्चित. मायक्रोसॉफ्टचाच एआय बॉट कॅन्सर आणि मल्टिपल स्क्लेरॉसिससारख्या रोगांवर उपचारपद्धती विकसित करण्यात मदत करत आहे. फेसबुक, अॅमेझॉनसारख्या कंपन्याच नव्हे तर मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि आयफोनसारखे मातब्बरही बॉटनिर्मितीच्या या गदारोळात अहमहमिकेने उतरले आहेत. मोबाइल आणि संगणकाद्वारे गप्पा मारणारा, मदत करणारा, माहिती देणारा असा हा सवंगडी भारतातही खूप उपयोगी ठरेल यात शंका नाही. अर्थात, ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेसाठी कधीही आव्हान उभे करू शकणार नाही हे मात्र तितकेच खरे.
No comments:
Post a Comment