Thursday, 30 June 2016

MDM

*सरल महत्वाचे* :
*(कृपया सदर पोस्ट सर्व ग्रुप वर शेअर करून शालेय पोषण आहार माहिती भरण्यासाठी सर्वाना मदत करावी ही विनंती)*
🔹 *MDM*🔹
1) सर्वांना सूचित करण्यात येत आहे की ज्या शाळेत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातो अशा शालेय पोषण आहाराच्या नोंदी सरल मध्ये ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या नोंदी आपणास 3 प्रकारे पुढील प्रकार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे
🔺 *सरल वेबसाइट च्या माध्यमातून*

🔺 *MDM मोबाइल application*

🔺 *SHORT TEXT MESSAGE(SMS)*

2) सध्या सरल वेबसाइट च्या माध्यमातून शालेय पोषण आहाराच्या नोंदी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.तसेच MDM मोबाइल application च्या माध्यमातून नोंद करण्याची सुविधा उद्या सायंकाळ पासून आणि मोबाइल द्वारे उपलब्ध असणारी SHORT TEXT MESSAGE (SMS) सुविधा पुढील काही दिवसाच उपलब्ध करुन दिली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.तशा सूचना आपणास दिल्या जातीलच.

3) सरल मधील school पोर्टल मध्ये MDM या प्रमुख tab ला क्लीक करुन आपण login करावयाचे आहे.login करत असताना id म्हणून आपल्या शाळेचा udise नंबर आणि पासवर्ड म्हणून school पोर्टल चा पासवर्ड हा MDM चा पासवर्ड असणार आहे याची नोंद घ्यावी.

4)लॉगिन केल्यावर आपणास 2 tab मध्ये काम करावयाचे आहे.
🔺 *opening balance*
🔺 *MDM Daily attendance*

5) opening balance या tab मध्ये आपणास भरावयाची माहिती ही अतिषय महत्वाची असून ती या वर्षाच्या सुरवातीलाच एकदाच भरावयाची आहे.या मध्ये मागील शैक्षणिक वर्षाअखेरचा शिल्लक धान्य साठा भरावयाचा आहे.ही माहिती एकदा भरल्यावर यापुढे आपला शिल्लक साठा ऑटोजनरेट होणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक  भरणे गरजेचे आहे.ही माहिती beo यांनी एकदा वेरीफाई केली की पुन्हा यात आपणास बदल करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

6) जर मागील वर्षी आपला धान्य साठा संपलेला असेल आणि आपण सदर धान्य अथवा धान्यादी माल उसना घेतला असेल तर अशा बाबतीत आपण आपले शिल्लक धान्य *मायनस* मध्ये लिहावयाचे आहे याची नोंद घ्यावी.आज मायनस मध्ये लिहन्याची ही सुविधा उशिरा उपलब्ध करुन दिली आहे.

7) जर आपली शाळा *प्राथमिक* (1 ते 5) असेल तर तसा ऑप्शन आपण निवडून घ्यावा आणि माहिती भरावी.जर शाळा प्राथमिक असेल परंतु वर्ग मात्र 4 थी पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असेल तरीही 1 ते 5 (primary) हा ऑप्शन select करावा आणि इयत्ता मध्ये आपल्याकडे  असलेल्या इयत्ता select करुन घ्याव्या आणि माहिती भरावी.

8) जर आपली शाळा *फक्त उच्चप्राथमिक* (6 ते 8) असेल तर तसा ऑप्शन आपण निवडून घ्यावा आणि माहिती भरावी.अशा वेळी 1 ते 5 (प्राथमिक) हा ऑप्शन निवडु नये.

9)जर आपली शाळा ही *प्राथमिक व उच्चप्राथमिक* म्हणजे (1 ते 8 म्हणजे both) असेल अशा वेळी 1 ते 5 आणि 6 ते 8 म्हणजेच फक्त प्राथमिक आणि फक्त उच्च प्राथमिक हा ऑप्शन न निवडता 1 ते 8 हा ऑप्शन निवडावा आणि सर्व इयत्ता select कराव्या व पुढील माहिती भरावी.

10) धान्याची नोंद घेताना  *कि.ग्रॅ* या एककामध्ये भरवायाचे आहे.उदा., आपनाकडे धान्य हे साडे सात किलो एवढे शिल्लक असेल तर ते आपण ते 7.500 असे लिहावे.दशांश चिन्हानंतर 3 डिजिट लिहिन्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.याची नोंद घ्यावी.

11)opening balance भरल्याशिवाय daily attendance ची माहिती आपणास भरता येणार नाही आहे.त्यामुळे आपण त्वरित ही माहिती भरून घ्यावी.

12)daily attendance भरत असताना इयत्तवार उपस्थित मुले (present student) भरावे आणि त्या खाली असलेल्या रकान्यात present मुलांपैकी किती मुलांना पोषण आहार दिला गेला आहे त्या मुलांची आकडेवारी लिहावयाची आहे.या रकान्यात किती धान्य दिले गेले हे लिहावयाचे नाही आहे हे लक्षात घ्यावे.

13) जरी आज आपण ही दोन्ही प्रकारची माहिती भरून पूर्ण केली नसेल तरी पुढील 2 दिवस ही माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.परंतु त्या नंतर मात्र रोजच्या रोजची माहिती रोज अपडेट करावयाची आहे.त्या वेळी आपणास मागील दिवसांची माहिती अपडेट करता येणार नाही याची नोंद घ्यावी.त्यामुळे आपणास दिलेल्या संधी चा लाभ घेऊन आपण ही माहिती भरण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विलंब करू नये अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत.

14) *अत्यंत महत्वाचे* :
आम्हाला असे लक्षात आले आहे की काही शिक्षक बांधव google play store मधून MDM स्किम अशा नावाचे application डाउनलोड करत आहे.तरी आपणास सूचित करण्यात येत आहे की अद्याप पर्यंत असे कोणतेही application हे nic किंवा शासनाने google play store ला उपलब्ध करून दिलेले नाही आहे याची नोंद घ्यावी. आपणास आपल्या या योजनेचे application हे लवकरच सरल वेबसाइट वर उपलब्ध करुन दिले जाणार आहे.आणि भविष्यात जरी google play store वर उपलब्ध करून दिले गेले तरी तशी सूचना सरल वेबसाइट वर दिली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

15) कृपया लवकरात लवकर आपण सदर माहिती भरून पूर्ण करावी.आपण केलेल्या विलंबामुळे भविष्यात अनुदान प्राप्त होण्यास अडचणी निर्माण झाल्या तर यासाठी सर्वस्वी आपण जबाबदार असाल अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत.

16) MDM मोबाइल application हे आपण रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबरवरच active होईल याची नोंद घ्यावी.त्यामुळे अद्याप आपण आपले मोबाइल नंबर रजिस्टर केले नसेल तर लवकरात लवकर रजिस्टर करुन घ्यावे अशा सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहे.

17)सरल संदर्भात कोणत्याही अडचणी आल्यास आमच्या *havelieducation.blogspot.in* या ब्लॉग ला भेट द्या.त्या ठिकाणी आपल्या सर्व अडचणी दूर करण्यात येईल.तेथे दिलेल्या विविध online google फॉर्म च्या मदतीने आपण आम्हाला आपल्या येणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात सांगू शकाल.तसेच आपण *९४०४६८३२२९* या whatsapp क्रमांकावर देखील message पाठवू शकता (call करू नये ).

18)✏ *राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे* :

आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे   ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी *http://havelieducation.blogspot.in*
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक  भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
( *सुचना*  : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)

19) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com

No comments: