Sunday, 27 March 2016

मराठी कोडे

मराठी कोड़े सोडवा

१]प्रश्न असा आहे कि उत्तर काय?_दिशा

२]एवढस कार्टं घर कसं राखतं?-कुलूप

३]इथेच आहे पण दिसत नाही?-हवा

४]दोन भाउ शेजारी, भेट नाही जन्मान्तरी?-डोळे

५]पांढरं पातेल पिवळा भात?-अंड

६]तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला?

७]सुपभर लाह्या त्यात एक रुपया?

८]हिरवी पेटी काट्यात पडली,उघडून पाहिली तर मोत्याने भरली?-भेंडी

९]तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई?माठ

१०]तीनजण वाढायला बाराजण जेवायला?घडयाळ

११]पाटिल बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब?मक्याचे कणीस

१२]पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं ,कात नाहि,
चुना नाही, तरी तोंड कसं रंगला?पोपट

१३]काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला?

१४]काट्याकुट्यांचा बांधला भारा,कुठं जातोस ढबुण्या पोरा?

१५]पुरूष असून पर्स वापरतो,वेडा नसून कागद फाडतो?वाहक

१६]कुट कुट काडी पोटात नाडी,राम जन्मला हात
जोडी कृष्ण जन्मला हात जोडी?

१७]हजार येती हजार जाती हजार बसती पारावर,अशी नार
ती जोराची हजार घेती ऊरावर?रेल्वे

१८]एवढीशी नन्नुबाय,सार्‍या वाटनं गीत गाय?घंटी

१९]कोकणातनं आली नार,तिचा पदर हिरवागार,तिच्या काखेला पोर.?

२०]कोकणातनं आली सखी,तिच्या मानंवर दिली बुक्की ,तिच्या घरभर लेकी?

२१]कोकणातनं आला भट ,धर की आपट?नारळ

२२]कांड्यावर कांडी सात कांडी,वर समुद्राची अंडी?

२३]मुकूट याच्या डोक्यावर,जांभळा झगा अंगावर?वांगे

२४]आटंगण पटंगण लाल लाल रान,अन् बत्तीस पिंपळांना एकच पान?जीभ

२५]कोकणातनं आला रंगूकोळी, त्यानं आणली भिंगू चोळी,शिंपीण म्हणते शिवू कशी,परटीण म्हणते धुवू कशी,अन् राणी म्हणते घालू कशी?

२६] सोन्याची सुरी भुईत पुरी,वर पटकार गमजा करी?झेंडा

२७]सगळे गेले रानात,अन् झिपरी पोरगी घरात?केरसुणी

२८]थई थकड धा.. तीन डोकी पाय धा.? २९]आग दानी बाग दानी बागेत होत्या चौघीजणी
हिरवा रंग कुंकवाणी
३०]एवढस तळ त्यात नंदिबैल खेळ

No comments: