Sunday, 19 March 2017

शालेय पोषण आहार काळजी

ESCHOOL2ALL
 🌯🌯 *शालेय पोषण आहार योजना राबवताना आपण खालिल काळजी घेता का*🌯
  *भाग (१) पहिला*
*आपण शाळेत दररोज मुलांना शालेय पोषण आहार देतो पण तो देत असताना काही लहान लहान गोष्टी कडे लक्ष देतो का? आपण जर खालिल गोष्टी वर लक्ष दिले तर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व आपण शालेय पोषण आहार योजना चांगल्या प्रकारे राबवू शकाल.
:small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond:
शालेय पोषण आहार देताना खालिल काळजी घ्यावी .

०१) शालेय पोषण आहार ज्या भांड्यात शिजवतो ती दररोज स्वच्छ धुवावेत.

०२) शालेय पोषण आहार हा विद्यार्थींना वाटप करताना गरम असतो तेव्हा तो वाटप करताना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

०३) ज्या ठिकाणी आपण शालेय पोषण आहार शिजवतो ती जागा *(किचनशेड)* नियमित स्वच्छ ठेवावे.

०४) शाळेमध्ये आग्निशामक यंञ असणे आवश्यक. (आग्निशामक यंञ नसल्यास पर्यायी व्यवस्था असावी.)

०५) स्वयंपाक गृहामध्ये अन्नधान्याची साठवणूक करताना धान्य खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी.

०६) धान्य साठवणूक कोरड्या जागेत व धान्य कोठ्यामध्ये करावी.

०७) शालेय पोषण आहार योजनेतून प्राप्त होणारा धान्साठा प्रथम वापरावा.

०८) प्राप्त धान्य व इतर साहित्य प्राप्त झाल्यावर त्यावरिल तारखा व्यवस्थित पाहाव्यात.

०९) शालेय पोषण आहार मुलांना वाटप करण्यापुर्वी मुख्याध्यापक किंवा शाळेतील शिक्षक यांनी तपासून घ्यावा.

१०) शालेय पोषण आहार वाटप करण्यापुर्वी त्याचा नमुना काढून ठेवावा.

क्रमशः

*शैक्षणिक माहितीकरिता माझा Blog ला आवश्य भेट द्या.*
:point_right:🏻 eschool2all.blogspot.com

   Whatsup पोस्ट मी विविध Whatsup च्या ग्रुपवर केलेल्या पोस्ट वाचण्यासाठी पोस्टच्या समोर क्लीक करा व पोस्टचे वाचन करा.व आपली प्रतिक्रि...

🌯🌯 *शालेय पोषण आहार योजना राबवताना आपण खालिल काळजी घेता का* :interrobang:🌯
:ribbon::ribbon: *भाग (२) दुसरा* :ribbon::ribbon:
*आपण शाळेत दररोज मुलांना शालेय पोषण आहार देतो पण तो देत असताना काही लहान लहान गोष्टी कडे लक्ष देतो का? आपण जर खालिल गोष्टी वर लक्ष दिले तर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व आपण शालेय पोषण आहार योजना चांगल्या प्रकारे राबवू शकाल.*
:small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond:
शालेय पोषण आहार देताना खालिल काळजी घ्यावी .

०१) शालेय पोषण आहार शिजवणा-या स्वयंपाकी व मदतनीस यांना अन्न् शिजवण्यापुर्वी हात व पाय साबणाने स्वच्छ धुवून घेण्यास सांगावे.

०२) शालेय पोषण आहार घेण्यापुर्वी मुलांनी हात व पाय स्वच्छ धुतले आहेत याची खाञी करुन घ्यावी.

०३) शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी बाजारातून आणलेला भाजीपाला स्वच्छ धुवून घेण्यास सांगावे.

०४) मुलांना ज्या ताठामधून जेव दिले जाते तसेच वापरात येणाऱ्या भांड्यांची स्वच्छता नियमितपणे करावी.

०५) शाळेतील मदतनीस, स्वंयपाकी व विद्यार्थी यांना वेळोवेळी स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगावे.

०६) शासनाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार विद्यार्थींना आठवड्यातून एकदा पुरक आहार देण्यात यावा.

०७) शालेय पोषण आहाराची नियमित चव संबंधित बचत गट/शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष/सद्श्य, मुख्याध्यापक , शाळेतील शिक्षक यांनी घेऊन त्याची नोंद चव रजिस्टर मध्ये करावी.

०८) शालेय पोषण आहार योजना अंमलबजावणी ची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती ची आहे. त्या विषयीच्या नोंद मुख्याध्यापक यांनी वेळच्या वेळी कराव्यात.

०९) शालेय पोषण आहार नियमित व चांगला कसा देता येईल याकडे मुख्याध्यापक यांनी लक्ष द्यावे.

१०) शालेय पोषण आहार योजनेसाठी लागणारा धान्य साठा वेळच्या वेळी उपलब्ध करुन घ्यावा. साठा संपत आला असेल तर त्याची कल्पना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी.

क्रमशः ------

   Whatsup पोस्ट मी विविध Whatsup च्या ग्रुपवर केलेल्या पोस्ट वाचण्यासाठी पोस्टच्या समोर क्लीक करा व पोस्टचे वाचन करा.व आपली प्रतिक्रि...

🌯🌯 *शालेय पोषण आहार योजना राबवताना आपण खालिल काळजी घेता का* :interrobang:🌯
:ribbon::ribbon: *भाग (३) तिसरा* :ribbon::ribbon:
*आपण शाळेत दररोज मुलांना शालेय पोषण आहार देतो पण तो देत असताना काही लहान लहान गोष्टी कडे लक्ष देतो का? आपण जर खालिल गोष्टी वर लक्ष दिले तर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व आपण शालेय पोषण आहार योजना चांगल्या प्रकारे राबवू शकाल.*
:small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond::small_orange_diamond:
शालेय पोषण आहार देताना खालिल काळजी घ्यावी .

०१) शालेय पोषण आहार योजना अंतर्गत असलेले सर्व अभिलेखे वेळच्या वेळी भरुन घ्यावेत.

०२) शाळेमध्ये शालेय पोषण आहार समिती स्थापन करुन तिच्या सभा आयोजित कराव्यात व प्रोसेडींग लिहावे.

०३) शालेय पोषण आहार चव रजिस्टर नेहमी अद्यावत ठेवावे.

०४) शाळेमध्ये असलेल्या मदतनीस यांच्या नेमणूक करार करुन नियमितपणे हजेरीची नोंद ठेवावी.

०५) इंधन बील अथवा इतर आर्थिक व्यवहार चेकचे करुन वेळच्या वेळी नोंद करावी.

०६) शाळेतील धान्य साठा खराब झाला असल्यास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सद्दश्य यांच्या समक्ष पंचनामा करुन त्याची नोंद करावी.

०७) शालेय पोषण आहार योजनेतून धान्य साठा प्राप्त झाल्यावर त्याची नोंद mdm portal ला करावी .

०८) शालेय पोषण आहाराची नोद न चुकता online भरावी.

०९) शालेय पोषण आहार योजनेशी संबंधित सर्वांचे नंबर आपणाकडे असावेत जसे डॉक्टर. अँबुलन्स आरोग्य आधिकारी केंद्रप्रमुख विस्तार आधिकारी गशी इत्यादी .

१०) अधिक माहिती साठी व तक्रारीसाठी राज्य स्तरीय टोल फ्री क्रमांक १८००२३३९९८८ वर संपर्क करावा.

:clap: *धन्यवाद* :clap:

No comments: